एक्स्प्लोर

Vinesh Phogat: विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार का?  CAS समोरील सुनावणीत काय घडलं? मोठी अपडेट समोर

Vinesh Phogat Disqualification Appeal: विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टससमोर रौप्य पदक मिळावं म्हणून अपिल केलेली होती.  

Vinesh Phogat Appeal पॅरिस : विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) ५० किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात अंतिम फेरीत धडक दिली होती. अंतिम फेरीपूर्वी करण्यात आलेल्या वजनाच्या चाचणीत ५० किलो पेक्षा तिचं वजन १०० ग्रॅम अधिक ठरल्यानं तिला निलंबित करण्यात आलं आणि शेवटच्या स्थानी ठेवण्यात आलं. या प्रकरणामुळं विनेश फोगाटसह संपूर्ण देशवासियांना मोठा धक्का बसला होता. यानंतर विनेश फोगाटनं या प्रकरणी  'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स' (CAS) मध्ये धाव घेतली होती. सीएएसनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ऑलिम्पिक संपण्यापूर्वी निर्णय येऊ शकतो. या प्रकरणातील सुनावणी आज पूर्ण होणार असून अंतिम निर्णयासाठी वाट पाहावी लागेल. 

सीएएसनं त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी म्हणजेच आजच सुनावणी पूर्ण होणार आहे. या प्रकरणी अंतिम निर्णय ऑलिम्पिक स्पर्धा संपण्यापूर्वी अंतिम निर्णय येईल अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं . हे प्रकरण एका तासात ऐकून निर्णय घेण्यासारखं नाही. विनेश फोगाटनं या प्रकरणात तातडीनं निवेदन केलं नाही मात्र, प्रक्रिया वेगात पुढं जाईल, असं सीएएसनं म्हटलं.  

विनेशची दमदार कामगिरी 

विनेश फोगाटनं उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत क्यूबाची पैलवान यस्नेलिस गुजमान लोपेझला 5-0 नं पराभूत करत विजय मिळवला होता. विनेश फोगाटनं उपांत्यपूर्व फेरीत यूक्रेनच्या ओखसाना लिवाचला ७-५ नं पराभूत केलं होतं. त्यापूर्वी जपानच्या सुवर्णपदक विजेत्या यूई सुसाकी हिला ३-२नं पराभूत केलं होतं. मात्र, अंतिम फेरीपूर्वी विनेश फोगाटला निलंबित करण्यात आलं. 

निलंबनाविरोधात विनेशची धाव

विनेश फोगाटनं निलंबित झाल्यानंतर 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स'मध्ये याचिका दाखल केली आहे. विनेश फोगाटनं वजन कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र तिला यश आलं नाही. वजन जास्त नोंदवलं गेल्यानं तिनं अखेर सीएएसमध्ये धाव घेतली.  

सीएएसचं काम कसं चालतं?

पहिलं ऑलिम्पिकमध्ये १८९६ मध्ये ग्रीसमध्ये खेळवलं गेलं होतं. मात्र, यानंतर काही वर्षांनी वाद निर्माण झाले होते. काही खेळाडूंनी नियमांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या वादांवर निर्णय घेण्यासाठी 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स' ची निर्मिती करण्यात आली होती. सीएएसची स्थापना1984 करण्यात आली होती. याचं मुख्यालय स्वित्झरलँडमध्ये आहे. ही एक स्वायत्त संस्था असून निर्णय स्वतंत्रपण घेत असते.   

संबंधित बातम्या :

Rohit Sharma : सर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायचीय फक्त, चाहत्याची रोहित शर्मा अन् श्रेयसला विनंती, दोघांची भन्नाट प्रतिक्रिया, Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget