Arshad Nadeem : आता अर्शद नदीमची आई म्हणते नीरजही माझा मुलगा, त्याला पण यश मिळो, दोन्ही खेळाडूंच्या मातांनी मनं जिंकली
Neeraj Chopra : नीरज चोप्रा हा माझा मुलगा असून तो देखील यशस्वी व्हावा, असं सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमच्या आईनं म्हटलं आहे.
पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं (Arshad Nadeem) सुवर्णपदक जिंकलं. तर नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) रौप्य पदक जिंकलं.अर्शद नदीमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत 92.97 मीटर एवढ्या अंतरावर भाला फेकला. नीरज चोप्रानं 89. 45 मीटर भाला फेकला. यामुळं नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. ऑलिम्पिकमध्ये विविध देशांचे खेळाडू स्पर्धेच्या निमित्तानं एकत्र येत असतात. यामध्ये खेळभावनेला महत्त्व दिलं जातं. अर्शद नदीमची आई आणि नीरज चोप्राची आई या दोघांनी भालाफेक स्पर्धेतील विजयानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
नीरज चोप्राच्या आई सरोज देवी (Saroj Devi ) यांनी ज्यानं सुवर्णपदक जिंकलं तो देखील आमचा मुलगा असून तो मेहनत करत असल्याचं म्हटलं होतं. सरोज देवी यांच्यानंतर आत पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या आईनं देखील नीरज चोप्राविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
अर्शद नदीमची आई काय म्हणाली?
नीरज चोप्रा माझा मुलगा नदीमच तो मित्र अन् भाऊ आहे. जय पराजय आपल्या नशीबाचा भाग आहे.“नीरज पण माझा मुलगा आहे, अल्लाहताला त्याला देखील यशस्वी करो, तो अर्शदचा भाऊ आहे अन् मित्र पण देखील आहे, असं अर्शद नदीमचा मित्र आहे, असं सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या आईनं म्हटलं.
नीरज चोप्रा याची आई सरोज देवी काय म्हणाल्या?
नीरज चोप्राच्या आई सरोज देवी यांनी मुलाच्या कामगिरीवर पूर्णपणे खूश असल्याचं म्हटलं. नीरज चोप्राची आई सरोज देवी यांनी रौप्य पदक देखील सुवर्णपदकासारखं आहे. नीरज चोप्रा जेव्हा परत येईल त्यावेळी त्याच्या पसंतीचं जेवण बनवणार असल्याचं सरोज देवी म्हणाल्या. सुवर्णपदक जिंकलं तो देखील आमचा मुलगा आहे, मेहनत करत होता, असं सरोज देवी यांनी म्हटलं.
ऑलिम्पिकच्या इतिहासात अर्शद नदीम यानं सर्वात लांब अंतरावर भाला फेकण्याचा विक्रम केला. अर्शद नदीमनं 92. 97 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रा यांनं देखील त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं. तर, अर्शद नदीम टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पाचव्या स्थानावर होता. त्यानं यावेळी सुवर्णपदक पटकावलं. नीरज चोप्राची आई सरोज देवी यांनी सांगितल्या प्रमाणं तो दुखापतग्रस्त असून देखील देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता.
#NeerajChopra पर #ArshadNadeem की माँ -
— Vinod Kapri (@vinodkapri) August 9, 2024
“नीरज भी मेरा बेटा है।अल्लाहताला उसे भी कामयाब करे।वो अरशद का भाई भी है। दोस्त भी है।”
Video @ghulamabbasshah
pic.twitter.com/Os3n6GKbCq
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या विषयी बोलताना मुलांनी फक्त रौप्य आणि सुवर्ण पदकं मिळवलेत, या मातांच्या ह्रदयाला हिऱ्याचं पदक सुद्धा कमी पडेल..! द्वेषमुक्त वातावरणात वाढलेली मुलं त्यांच्या कर्तृत्वानेच नाही, तर वागण्यानेही जगात नाव कमावतात, असं म्हटलं.
संबंधित बातम्या :
"ज्याला सुवर्ण मिळालं, तोही माझा मुलगा", नीरज चोप्राच्या आईची मन जिंकणारी प्रतिक्रिया!
Neeraj Chopra : भारताल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं रौप्यपदक, नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी