Vinesh Phogat : CAS च्या निकालाबाबत तारीख पे तारीख सुरु, विनेश फोगाटच्या याचिकेवर निकाल कधी येणार? नवी माहिती समोर
Vinesh Phogat News : भारताची पैलवान विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमधील निलंबनाविरोधात सीएएसमध्ये धाव घेतली होती.
नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिनं पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीतील सामन्यापूर्वी निलंबित करण्यात आलं होतं. विनेश फोगाटला पदक मिळाल्यानंतर जल्लोषाची तयारी करणाऱ्या देशवासियांना देखील यामुळं धक्का बसला होता. अंतिम फेरीतपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं जास्त नोंदवलं होतं. यामुळं तिला निलंबित करण्यात आलं होतं. विनेश फोगाटनं या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये याचिका दाखल केली होती. या प्रकरणात CAS कडून पुन्हा एकदा निर्णय लांबणीवर टाकला गेला आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर आज निर्णय येणं अपेक्षित होतं. आता विनेश फोगाटच्या याचिकेवर निर्णय 16 ऑगस्टला येणार आहे.
विनेश फोगाटनं उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश करताना जपानच्या सुवर्णपदक विजेत्या यूई सुसाकीचा पराभव केला होता. उपांत्यपूर्व फेरीत यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा देखील विनेशनं पराभव केला होता. तर, उपांत्य फेरीत क्यूबाच्या वाय. गुझमान लोपेझ हिचा पराभव केला होता. मात्र, अंतिम फेरीपूर्वी तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं.
विनेश फोगाटनं राष्ट्रकूल स्पर्धेत तीन सुवर्णपदकं जिंकली आहेत. आशियाई स्पर्धेत एकदा सुवर्ण आणि कांस्य पदकावर विनेशनं नाव कोरलं आहे.
विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये रौप्य पदक मिळावं यासाठी याचिका दाखल केली होती. भारतीय ऑलिम्पिक संघाचे वकील हरीश साळवे यांनी विनेश फोगाटची बाजू मांडली होती. या प्रकरणी सुनावणी 9 ऑगस्टला झाली होती. विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅम अधिक नोंदवलं गेल्यानं तिला निलंबित करण्यात आलं होतं.
दरम्यान विनेश फोगाट ही 53 किलो वजनी गटातून कुस्ती खेळते मात्र, पॅरिस ऑलिम्पिकसाठी या वजनी गटातून अमित पंघाल पात्र ठरली होती. यामुळं विनेश फोगाटनं 50 किलो वजनी गटातून फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात सहभाग घेतला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटनं एकाच दिवसात तीन सामने खेळले होते. यानंतर तिनं वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी करण्यात आलेल्या वजनाच्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन अधिक आढळलं अन् तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. यानंतर विनेश फोगाटनं सीएएस मध्ये धाव घेतली होती.
संबंधित बातम्या :
Vinesh Phogat: विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार का? CAS समोरील सुनावणीत काय घडलं? मोठी अपडेट समोर