Tokyo Olympics Day 6 Schedule: उद्या महिला हॉकी संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा, पाहा संपूर्ण शेड्यूल
India Schedule, Tokyo Olympic 2020 Matches List: भारत विरुद्ध ब्रिटन, महिला पूल ए सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता होईल. हॉकीमध्ये भारतीय महिला संघाचा सामना ब्रिटनशी होईल.
Tokyo Olympics Day 6 Schedule: टोकियो ऑलिम्पिकचे आज 5 दिवस पूर्ण झाले. आतापर्यंत केवळ एक रौप्यपदक भारताच्या खात्यात आले आहे. सहाव्या दिवशी भारताला पदक जिंकून देण्यासाठी अनेक खेळाडू मैदानात उतरतील. या खेळाडूंकडूनही संपूर्ण देशाला मोठ्या आशा आहेत. त्यामुळे या खेळाडूंची कामगिरी कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. टोकियो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारतीय खेळाडूंच्या वेळापत्रकविषयी माहिती जाणून घेऊया.
हॉकी
भारत विरुद्ध ब्रिटन, महिला पूल ए सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता होईल. हॉकीमध्ये भारतीय महिला संघाचा सामना ब्रिटनशी होईल.
बॅडमिंटन
पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या गटातील स्टेज सामना खेळेल. हा सामना पहाटे 7.30 वाजेपासून सुरु होईल. बी साई प्रणीथ पुरुष एकेरीच्या गटातील स्टेज सामना खेळेल. हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल.
तिरंदाजी (वैयक्तिक स्पर्धा)
तरुणदीप राय सकाळी 7.31 वाजता पुरुष अंतिम 32 प्रकारात तिरंदाजी करेल.
दुपारी 12:30 वाजेपासून प्रवीण जाधव, पुरुष अंतिम 32 प्रकारात तिरंदाजी करेल.
दीपिका कुमारी दुपारी 2.14 वाजता महिला अंतिम 32 प्रकारात तिरंदाजी करताना दिसेल.
रोईंग
अर्जुन लाल जट आणि अरविंद सिंग, पुरुष डबल स्कल्स सेमी फायनल ए / बी 2 सामना सकाळी आठ वाजल्यापासून होईल.
सेलिंग
सकाळी आठ 8.35 वाजेपासून केसी गणपती आणि वरुण ठक्कर, पुरुष स्किफ 49 ER यांच्यात सामना होईल.
बॉक्सिंग
दुपारी 2.33 वाजता पूजा राणी महिलांच्या 75 किलो गटातील, अंतिम 16 वर्ष प्रकारात खेळेल.
महिला हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा
मंगळवारी भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शुअर्ड मारिने यांनी सांगितले की, जर्मनीविरुद्धच्या सामन्यानंतर संघात सकारात्मक बदल दिसले आहेत. ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात बुधवारी देखील संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल.