Aussi Swimmer Video Viral : सुवर्ण पदक जिंकल्याच्या आनंदात महिला स्वीमरची जीभ घसरली, चूक लक्षात येताच तत्काळ सुधारली
कायली मैकनेन सुवर्ण पदक जिंकल्याच्या आनंदात पत्रकारांशी बोलताना जीभ घसरली आणि तिच्याकडून एक चूक झाली
Tokyo Olympics 2020 : कधीकधी आपल्या जीवनांत अशा अनेक गोष्टी घडून गेलेल्या असतात ज्यामुळे आपल्याला खूप मनस्ताप होतो. त्रास सहन करावा लागतो. शब्द हे बाणाप्रमाणे असतात . एकदा तोंडातून निघाले कि परत मागे घेता येत नाहीत . आता हेच बघा ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू कायली मैकनेन हीची सुवर्ण पदक जिंकल्याच्या आनंदात पत्रकारांशी बोलताना जीभ घसरली आणि तिच्याकडून एक चूक झाली. काही क्षणातच ही चूक लक्षात येताच तीने चूक सुधारली, तिच्या प्रतिक्रियेवर नेटीझन्सच्या मिश्र प्रतिकिया उमटल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू कायली मैकनेनने 100 मीटर बॅकस्ट्रोक पोहण्याच्या स्पर्धेत 57.47 सेंकदमध्ये पूर्ण करत एक नवा इतिहास रचला. यानंतर जेव्हा पत्रकारांनी कायलीला प्रश्न विचारला तर अतिउत्साहात तिच्या तोंडातून F...k असा शब्द आला. कायलीला लगेच आपण काहीतरी चुकीचे बोललो याची जाणीव झाली आणि तिने सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. कायली मैकनेनच्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर अनेक कमेंट केल्या आहे.
Starting a “best daily moments of the Olympics” thread with this Hall of Fame entry from Kaylee McKeown after winning gold: pic.twitter.com/6NVuOnUfss
— Josh Butler (@JoshButler) July 27, 2021
ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू कायली मैककेनने या वर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले. त्यानंतर एका पत्रकाराने मैककनला विचारले की, सुवर्ण पदक जिंकल्यानंतर आपल्या आई आणि बहिणीला काय सांगायला आवडेल? त्यानंतर कायलीच्या तोंडातून हा अतिउत्साहात शब्द बाहेर पडला आणि नेमका हाच व्हिडीओ ट्विटर आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि ती ट्रोल झाली आहे. तर काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.