एक्स्प्लोर

Olympic 2020 | ... तर ऑलिम्पिक रद्द होणार; टोकियो ऑलिम्पिक कमिटीचा इशारा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने यंदाच्या वर्षी टोकियोमध्ये पार पडणारी स्पर्धा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला होता. परंतु आता जर कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला नाही तर स्पर्धा पुढे न ढकलता रद्द करण्यात येणार असल्याचं टोकियो ऑलिम्पिक कमिटीने सांगितलं आहे.

टोकियो : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे जगभरातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आलं आहे. परंतु, जर कोरोनाचा कहर असाच सुरू राहिला तर मात्र ऑलिम्पिक पुन्हा एकदा रद्द केली जाऊ शकते, त्यावेळी मात्र स्पर्धेची तारीख वाढवण्यात येणार नाही. स्पर्धा रद्द करण्यात येईल, असा इशारा टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी दिला आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी म्हणाले की, 'भविष्यात जर कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळवता आलं नाही आणि ऑलिम्पिंक पुन्हा एकदा रद्द करण्याची वेळ आली. तर मात्र स्पर्धेची तारिख पुढे ढकलण्यात येणार नाही आणि स्पर्धा रद्द करण्यात येईल.'

टोकियो ऑलिम्पिक जुलै-ऑगस्टमध्ये पार पडणार होतं परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलै-ऑगस्टमध्ये होणारं टोकियो ऑलिम्पिक रद्द करून एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धेच्या पुढिल तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, पुढिल वर्षी म्हणजेच, 2021मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.

ऑलिम्पिक 2024 वर परिणाम होणार नाही

ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलताना समितीने हे स्पष्ट केले होते की, पुढच्या वर्षीच्या स्पर्धेचे नावही टोकियो ऑलिम्पिक 2020 असणार आहे. रद्द करण्यात आलेल्या स्पर्धेचा ऑलिम्पिक 2024 वर कोणताही परिणाम होणार नाही. ऑलिम्पिक चार वर्षांतून एकदा घेण्यात येते. जर 2021 हे नाव दिले असते तर पुढील ऑलिम्पिकचे आयोजन 2025 साली करावे लागले असते. म्हणून स्पर्धा जरी 2021 साली घेण्यात येणार असल्या तरी नाव हे ऑलिम्पिक 2020 असणार आहे.

जपान सरकार, टोकियोचं स्थानिक प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने आपण या संकटाचा सामना करु असा मला विश्वास आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी आभार मानले होते.

न्यूझीलंड, जर्मनी, इंग्लंडनेही ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी

कॅनडा आणि अमेरिकेच्या निर्णयानंतर न्यूझीलंड, जर्मनी, इंग्लंडदेखील ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी ऑलिम्पिक समितीवर दबाव आणत होते. सर्व देशांचं म्हणणं होतं की, ऑलिम्पिकदरम्यान, खेळाडूंना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे यासर्व देशांनी ऑलिम्पिक खेळांना एक वर्षांसाठी स्थगित करण्याची मागणी केली होती.

भारतीय खेळाडूंनीही केला होता विरोध

भारतीय अॅथलिट्स ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्याची मागणी करत होते. भारताचा पहिल्या क्रमांचा रेसलर बजरंग पुनियाने यासंदर्भात बोलताना सांगितले होते की, 'जर जिवंत राहिलो तर कधीना कधी ऑलिम्पिक खेळण्याची संधी नक्कीच मिळेल. यावरून स्पष्ट होत होतं की, खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या विरोधात होते. याव्यतिरिक्त प्रॅक्टिस सेशन रद्द झाल्यामुळे खेळाडूंना प्रॅक्टिस करणंही अशक्यचं होतं.

संबंधित बातम्या : 

Olympic 2020 | टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर

Olympic 2020 | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक रद्द; एक वर्षाने आयोजन

Coronavirus | IPL 2020 रद्द झाल्यास मोठं नुकसान, पाच मोठे फटके कोणते?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget