एक्स्प्लोर

मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; यामागचं कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Paris Olympics 2024: सरबज्योत सिंग आणि मनू भाकरने नोकरीची ऑफर न स्वीकारण्याचे कारणही दिले आहे.

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) भारताला नेमबाजीच्या स्पर्धेत तीन पदके मिळाली. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर (Manu Bhaker) यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारने नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र दोघांनीही हे सरकारी काम करण्यास नकार दिला आहे. सरबज्योत सिंग आणि मनू भाकरने नोकरीची ऑफर न स्वीकारण्याचे कारणही दिले आहे.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी सरकारी नोकरी करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. दोघांचं म्हणणं आहे की ते नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळत आहे. दरम्यान, मनू भाकर आणि सबरज्योत सिंग यांना क्रीडा विभागात उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती. 

मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाकडून 30 लाख रुपयांचे बक्षीस-

ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने 30 लाख रूपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे, असे मनू भाकरने सोशल मीडियावर ट्विट करत म्हटलं आहे. 

भारताला एकूण 6 पदके-

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले आहे.

चीन अव्वल स्थानावर-

पदकतालिकेवर नजर टाकली तर चीन अव्वल आहे. चीनने एकूण 90 पदके जिंकली आहेत. त्यात 39 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्य पदक आहेत. सुवर्णपदक जास्त जिंकल्याने चीन पहिल्या क्रमांकावर आहे. यूएसए दुसऱ्या स्थानावर आहे. यूएसएने 38 सुवर्णांसह 122 पदके जिंकली आहेत. त्यात 42 रौप्य आणि 42 कांस्य पदकांचा समावेश आहे. 

संबंधित बातमी:

CAS ने विचारले तीन महत्वाचे प्रश्न; चेंडू आता विनेश फोगाटच्या कोर्टात, भारताला रौप्य पदक मिळणार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget