Video : रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO
Jay Shah on Rohit Sharma : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

Jay Shah on Rohit Sharma : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून या भव्य स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यावेळी टीम इंडिया गतविजेती म्हणून मैदानात उतरणार असली, तरी चाहत्यांसाठी एक गोष्ट खटकणारी ठरणार आहे, या ऐतिहासिक मोहिमेचा नायक कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेत दिसणार नाही. रोहित शर्माने मागील टी20 विश्वचषकनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे तो 2026 च्या वर्ल्ड कपचा भाग नसणार आहे. मात्र, आयसीसीचे चेअरमॅन जय शाह यांच्यासाठी रोहित आजही कर्णधारच आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या अगदी तोंडावर झालेल्या एका कार्यक्रमात जय शाह यांनी रोहितचा उल्लेख थेट आमचा कर्णधार असा केला. तेही सध्याचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव समोर असताना.
Jay Shah said "Our captain (Rohit Sharma) is sitting here & I will call him Captain because he has won two trophies for us. In 2023, we won 10 matches in a row and won everyone’s hearts but we couldn’t win the trophy. After that, I said in Rajkot that this time we will win both… pic.twitter.com/mM0hygG3Ie
— Johns. (@CricCrazyJohns) January 8, 2026
अलीकडेच मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भारताच्या विविध वर्ल्ड चॅम्पियन संघांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन पुरुष संघ, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला वर्ल्ड चॅम्पियन संघ आणि दीप्ती केसीच्या नेतृत्वाखालील ब्लाइंड महिला वर्ल्ड चॅम्पियन संघ यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात वर्ल्ड कप जिंकलेल्या संघांचे बहुतांश खेळाडू उपस्थित होते. त्याचवेळी तत्कालीन बीसीसीआय सचिव असलेले जय शाहही मंचावर होते.
जय शाहांनी रोहितलाच कर्णधार का म्हटलं?
मंचावर भाषण करताना जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितलं, “आपला कर्णधार रोहित शर्मा इथेच बसला आहेत. मी त्यालाच कर्णधार म्हणेन.... कारण त्याने आपल्याला दोन मोठ्या ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकूनही आपण ट्रॉफी जिंकू शकलो नाही, पण लोकांची मनं जिंकली. फेब्रुवारी 2024 मध्ये राजकोटमध्ये मी म्हटलं होतं, या वेळी आपण मनंही जिंकू आणि चषकही जिंकू.” जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.
Jay Shah 🗣️: “our captain Rohit Sharma is sitting here. I am still calling you captain because under you, we won two ICC trophies”.
— Kusha Sharma (@Kushacritic) January 8, 2026
Jay Shah is grateful to Rohit Sharma for ending the drought of ICC trophies for India 🥹🇮🇳pic.twitter.com/7xjVZdjkwQ
आता सूर्यावर जबाबदारी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकला. हा भारताचा 2013 नंतरचा पहिला आयसीसी किताब ठरला. त्यानंतर मार्च 2025 मध्ये भारताने पुन्हा एकदा रोहितच्या कप्तानीत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. वर्षानुवर्षे चाललेला ट्रॉफीचा दुष्काळ संपवतानाच, एका नव्या सुवर्णकाळाची सुरुवात झाली.
आता ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्यावर आहे. 2026 चा टी20 वर्ल्ड कप भारतासाठी आणि सूर्यासाठी खास ठरणार आहे. कारण ही स्पर्धा भारतातच होणार असून, घरच्या मैदानावर, घरच्या चाहत्यांसमोर भारत किताबाचं संरक्षण करणार आहे. याचसोबत भारताकडे घरच्या मैदानावर टी20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरण्याची, तर सूर्यकुमार यादवकडे पहिला आयसीसी किताब जिंकणारा टी20 कर्णधार बनण्याची ऐतिहासिक संधी असेल.
हे ही वाचा -





















