एक्स्प्लोर
Advertisement
नरसिंग कटाचा बळी, न्यायासाठी लढणारः WFI
नवी दिल्लीः कुस्तीपटू नरसिंग यादव निर्दोष असून तो एका कटाचा बळी आहे, असं सांगत नरसिंग यादवच्या पाठिंब्यासाठी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) मैदानात उतरला आहे. नरसिंग यादववर अन्याय झाला असून त्याला न्याय मिळेल, अशी आशा WFI ने व्यक्त केली आहे.
रिओ ऑलिम्पीकमध्ये नरसिंगने भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असं WFI चे अध्यक्ष ब्रीज भूषण शरण सिंह यांनी सांगितलं. नाडा अर्थात नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत 5 जुलै रोजी चाचणी केली होती. या चाचणीमध्ये नरसिंग यादव ए, बी सॅम्पलमध्ये दोषी आढळला आहे.
नरसिंगवर अन्याय, WFI चा आरोप
नरसिंगवर अन्याय झाला असून तो निर्दोश आहे. WFI चा नरसिंगला पूरेपूर पाठिंबा आहे. रिओ ऑलिम्पीकमध्ये 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनीधीत्न नरसिंगनेच करावं आणि सुवर्ण पदक मिळावावं, यासाठी WFI नरसिंगला बळ देईल, असा विश्वास WFI च्या अध्यक्षांनी व्यक्त केला.
संबंधित बातमीः
कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
जळगाव
Advertisement