एक्स्प्लोर
होय, मला मुरलीधरनची भीती वाटायची : सेहवाग

मुंबई: अनेक गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने, त्याला कोणत्या गोलंदाजाची भीती वाटत होती, याबाबतचं गुपीत उघड केलं आहे.
"माझ्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत
मला श्रीलंकेचा माजी गोलंदाज
मुथय्या मुरलीधरनचीच भीती वाटायची",
असं सेहवागने कबूल केलं.
मुरलीधरनचा अचूक टप्पा आणि गोलंदाजी शैलीमुळे त्याच्या गोलंदाजीवर खेळणं अवघड होतं, असं सेहवागने सांगितलं. क्रिकेट कारकिर्दीत सेहवाग आणि मुरलीधरन यांचा अनेकदा सामना झाला. मुरलीधरनने तीनवेळा सेहवागला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मात्र सेहवागने 2008 च्या श्रीलंका दौऱ्यात मुरलीधरन आणि अजंता मेंडिस यांच्या गोलंदाजीवर चांगलाच प्रहार केला होता. गॅले कसोटीत सेहवागने नाबाद 201 धावा ठोकल्या होत्या. याशिवाय सेहवाग आणि मुरलीधरन यांच्यातील आणखी एक द्वंद्व 2009 मध्ये मुंबई कसोटीत पाहायला मिळालं होतं. त्यावेळीही सेहवागने श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करत 293 धावा ठोकल्या होत्या. सेहवागने अनेक गोलंदाजांची धुलाई केली. त्यामध्ये मुरलीधरनचाही समावेश असला, तरी त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे सेहवाग काहीसा बिचकत होता. मुरलीच्या 'दुसरा'ने तर अनेक फलंदाजांना धडकी भरवली होती. मुरलीधरनच्या गोलंदाजी शैलीवर अनेकवेळा आक्षेप घेण्यात आले. मात्र मुरलीधरन सर्व समस्यांना सामोरं गेला. इतकंच नाही तर तो जेव्हा निवृत्त झाला, त्यावेळी जगातील सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर होता. मुरलीधरनने 132 कसोटी सामन्यात 800 विकेट घेतल्या. VIDEO: सेहवागच्या नाबाद 201 धावाआणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























