एक्स्प्लोर
'कॅप्टन कूल'ला गुस्सा अंगलट, अम्पायरवर चिडल्याबद्दल धोनीला दंड
'नो बॉल' घोषित केलेला चेंडू पुन्हा वैध दिल्याचं कळताच कर्णधार महेंद्रसिंग धोनीअम्पायरना जाब विचारण्यासाठी थेट मैदानात आला. यावेळी धोनी अम्पायर गंधे यांच्या निर्णयावर बराच चिडलेला दिसला
मुंबई : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची 'कॅप्टन कूल' अशी ख्याती आहे. मात्र आपल्याला लौकिकाला साजेसा नसलेला राग आळवणं धोनीला महागात पडणार आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 'नो बॉल' देणाऱ्या अम्पायरवर चिडचिड केल्याप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन धोनीला दंड ठोठावण्यात आला आहे.
चेन्नई आणि राजस्थान संघांमधल्या सामन्याला अम्पायरच्या चुकीमुळे वादाचं गालबोट लागलं. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुरुवारी हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या अखेरच्या षटकात बेन स्टोक्सचा चौथा चेंडू मुख्य अम्पायर गंधे यांनी 'नो बॉल' घोषित केला. पण स्क्वेअर लेग अम्पायर ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी मात्र तो 'नो बॉल' नसल्याचं सांगितलं.
'नो बॉल' घोषित केलेला चेंडू पुन्हा वैध दिल्याचं कळताच कर्णधार महेंद्रसिंग धोनी अम्पायरना जाब विचारण्यासाठी थेट मैदानात आला. यावेळी धोनी अम्पायर गंधे यांच्या निर्णयावर बराच चिडलेला दिसला. त्यानंतर ऑक्सनफर्ड यांनी धोनीची समजूत काढत त्याला माघारी धाडलं. त्यामुळे कॅप्टन कूल अशी ओळख असलेल्या धोनीचं अँग्री रुप क्रिकेटरसिकांना पाहायला मिळालं. स्पेशल रिपोर्ट| खेळ माझा| धोनीची नवी फॅन, कोण आहे नताशा चेरियाथ? आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी धोनीला सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. धोनीने लेव्हल 2 नियमाचं उल्लंघन केल्याची कबुली दिल्याचंही आयपीएलतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मिचेल सॅन्टनरने अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकाराने चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सवर चार विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवून दिला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना सॅन्टनरने बेन स्टोक्सला विजयी षटकार ठोकला. रांची : धोनीची मुलगी झिवासोबत विराटचे बोबडे बोल या सामन्यात चेन्नईकडून महेंद्रसिंग धोनीने 58, तर अंबाती रायुडूने 57 धावांची मोलाची खेळी केली. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचली.Thala Dhoni on the fire???????????????? pic.twitter.com/NHSzXDWp9u
— Sarkar Sankar (@SarkarSankar7) April 12, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement