एक्स्प्लोर

Mohammed Shami : ..पण माझ्या क्षणाची वाट पाहत होतो! 12 वर्षांनी 'फायनल' मार्ग दाखवताच मोहम्मद शमी काय म्हणाला?

Mohammed Shami : मोहम्मद शमीने या सामन्यात विश्वचषकात सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. मोहम्मद शमीच्या धोकादायक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावांवर सर्वबाद झाला.

मुंबई :  2015 आणि 2019 अशा दोन वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलला टीम इंडियाला झटका बसल्यानंतर आता रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं इतिहास घडवला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. शमीने तब्बल 7 विकेट घेत पुन्हा एकदा विरोधी संघासाठी कर्दनकाळ झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या. भारताच्या या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्या, पण त्यानंतर मिशेल आणि विल्यमसनने तिसऱ्या विकेटसाठी 181 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली होती. मात्र, मोहम्मद शमीने पुन्हा एकदा मदतीला धावत  कर्णधार केन विल्यमसन आणि टाॅम लॅथमला बाद करत सामन्यात परत आणले. 

मोहम्मद शमीने सामना पलटला

न्यूझीलंडने 32.1 षटकात 2 गडी गमावून 220 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर मोहम्मद शमीने केन विल्यमसनची विकेट घेत न्यूझीलंडची भागीदारी मोडून काढली आणि टीम इंडियाला विजयाकडे नेले. त्यानंतर ग्लेन फिलिप्ससह डॅरिल मिशेलने आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. डॅरिल मिशेलने 119 चेंडूत 134 धावांची खेळी केली. डॅरिल मिशेल आपल्या संघाला क्रॅम्प असतानाही विजयाकडे नेत होता, परंतु मोहम्मद शमीने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात शमीने 9.5 षटकात 57 धावा देत 7 विकेट्स घेतल्या आणि या विश्वचषकात सुद्धा सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या.

12 वर्षांनी 'फायनल' मार्ग दाखवताच मोहम्मद शमी काय म्हणाला?

विजयानंतर सामनावीर ठरलेला शमी म्हणाला की, मी माझ्या क्षणाची वाट पाहत होतो. मी पांढऱ्या चेंडूमध्ये जास्त क्रिकेट खेळत नव्हतो. माझ्या मनात होते, आपण यॉर्कर्स आणि स्लोअर बॉल यांसारख्या बर्‍याच गोष्टींबद्दल बोलतो. मी नवीन चेंडूने विकेट घेण्याचा प्रयत्न केला. मी नवीन चेंडूने जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो. मी केन विल्यमसनचा झेल सोडला तेव्हा वाईट वाटले. मी वेग घेण्याचा प्रयत्न केला. ते त्यांचे फटके खेळत होते, म्हणून, मी एक संधी घेतली, विकेट चांगली होती. दवची भीती होती. गवत छान कापले होते. धावा पुरेशा होत्या. दव आले असते तर परिस्थिती बिघडली असती. हळूवार चेंडू कदाचित काम करत नसतील. मला आश्चर्यकारक वाटते. हे एक मोठे व्यासपीठ आहे. 2015 आणि 2019 च्या WC मध्ये आम्ही उपांत्य फेरीत हरलो. मला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ पाहत आहे. आपल्या सर्वांना अशी संधी पुन्हा कधी मिळेल माहीत नाही.

याशिवाय मोहम्मद शमीने या सामन्यात विश्वचषकात सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. मोहम्मद शमीच्या धोकादायक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून भारताने केवळ अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले नाही तर 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. आता मोहम्मद शमी अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget