(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयपीएलमधला 'सुपर' डुपर डे! किंग्ज इलेव्हन पंजाबचा सुपर ओव्हरमध्ये विजय; मुंबईचा तिसरा पराभव
MI vs KXIP IPL 2020 : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबने सुपर ओव्हरमध्ये मुंबईविरोधात सामना जिंकला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. मात्र, पंजाबला 176 धावांपर्यंतचं मजल मारता आली. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला.
MI vs KXIP IPL 2020: आयपीएल 2020 च्या 36 व्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सनचा पराभव केला. या सामन्यात पहिल्यांदा खेळताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत सहा गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजबाचा संघ निर्धारित षटकांत 6 गडी गमावून 176 धावाच काढू शकला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला. मात्र, तिथेही सामना टाय झाल्याने दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यात पंजाबने बाजी मारली.
मुंबईने दिलेलं 176 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर कर्णधार के एल राहुल आणि मयांक अगरवालने डावाची सुरुवात केली. के एल राहुल आजही त्याच्या लयीत दिसत होता. जसप्रीत बुमराहने मयांकला अगरवालला 11 धावांवर त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलने के एल राहुलला काही वेळ साथ दिली. राहुल चहरने गेलची विकेट घेतली. गेलने 21 चेंडूत 24 धावा केल्या. दरम्यानच्या काळात के एल राहुलने आपलं अर्धशतक साजरं केले. त्याच्यासोबत निकोलस पुरनही फटकेबाजी करत होता. ही जोडी चांगली जमली असताना निकोलस 24 धावांवर बाद झाला. एका बाजूने गळती सुरु असताना कर्णधार के एल राहुलने दुसरी बाजू लावून धरली होती. मात्र, ऐन मोक्याच्याक्षणी बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. दीपक हुडा आणि ख्रिस जॉर्डनने अखेरपर्यंत संघर्ष केला. मात्र, सामना बरोबरीत सुटल्याने मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. मुंबईकडून सर्वाधिक जसप्रीत बुमराहने 3 गडी बाद केले तर राहुल चहर दोन खेळाडूंना माघारी धाडलं.
आयपीएलच्या मैदानात 'रॉकस्टार' अंपायर, पश्चिम पाठक यांची अनोखी स्टाईल सोशल मीडियात ट्रेंड
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉकने सुरुवात तर चांगली केली पण अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर रोहित 9 धावांवर क्लिन बोल्ड झाला. यानंतर सूर्यकुमार यादवही भोपळा न फोडता माघारी परतला. मोहम्मद शमीने मुरगन आश्विनकडे झेलकरवी त्याला बाद केले. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या इशान किशननेही या सामन्यात निराशा केली. एकीकडे मुंबईचे फलंदाज माघारी परतत असताना डी-कॉकने एक बाजू लावून धरली होती.
कृणाल पांड्यासोबत डी-कॉकने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. ही जोडी मैदानावर स्थिरावत असतानाच बिश्नोईनेही ही जोडी फोडली. त्याने कृणालला माघारी धाडलं. त्याने 34 धावा केल्या. दरम्यानच्या काळात डी-कॉकने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हार्दिक पांड्याही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये फटरेबाजी करण्याच्या प्रयत्नात डी-कॉक ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 43 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 53 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कायरन पोलार्डने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केली. कुल्टर-नाईलच्या मदतीने पोलार्डने मुंबईला 176 धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंहने प्रत्येकी 2-2 तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.