(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lionel Messi Update: बार्सिलोना क्लब सोडताना लियोनेल मेस्सी भावुक, पत्रकार परिषदेत अश्रू अनावर!
Messi Leaves Barcelona : स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडला असून बार्सिलोना क्लबकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Messi Leaves Barcelona : दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी आणि बार्सिलोना क्लब यांचा प्रवास आता संपला आहे. तब्बल 21 वर्षांनी मेस्सीनं बार्सिलोनाची साथ सोडली. एफसी बार्सिलोनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. बार्सिलोना स्पष्ट सांगितलं आहे की, आता लियोनेल मेस्सी बार्सिलोनासोबत खेळणार नाही.
आज मेस्सीला निरोप देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत क्लब सोडल्याचे जाहीर करण्यात येणार होते. परंतु त्या अगोदर मेस्सी भावूक झाला आणि मेस्सीला अश्रू अनावर झाले.
मेस्सी वयाच्या सोळाव्या वर्षापासून बार्सिलोनासोबत जोडला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सीचं बार्सिलोनासोबत असलेला करार 30 जून रोजी संपला. त्यानंतर आता मेस्सी दुसरा कोणताही क्लब जॉईन करु शकतो. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून मेस्सी बार्सिलोनासोबत आपला प्रवास सुरु ठेवणार असल्याचं बोललं जात होतं. पण, आता यासर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आता मेस्सी बार्सिलोनाची साथ सोडली असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे.
#BREAKING Lionel Messi in tears at start of Barcelona press conference at which he is expected to confirm he is leaving club #AFPSports pic.twitter.com/BIHgqISKfO
— AFP News Agency (@AFP) August 8, 2021
बार्सिलोनानं मेस्सीच्या 21 वर्षांच्या सोबतीसाठी आणि योगदानासाठी त्याचे आभार मानले आहेत. तसेच भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. गेल्या आठवड्यात स्पॅनिश फुटबॉल लीगचे प्रेसिडेंट जेवियर टेबस म्हणाले होते की, बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या डोक्यावर सध्या 1.18 बिलियन डॉलर्सचं कर्ज आहे. भारतीय चलनाप्रमाणे, जवळपास 8 हजार कोटींहून अधिक कर्ज क्लबवर आहे. मेस्सीने 700व्या गोलसोबतच आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये एक नवा मैलाचा दगड मिळावला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटिना आणि क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोनाकडून खेळताना गोल डागत मेस्सी जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू ठरला आहे.