Tokyo Olympics 2020: रवी दहियाचा सामना बघताना तिहार जेलमध्ये कुस्तीपटू सुशील कुमार भावुक
Tokyo Olympics 2020: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी दहिया पराभूत झाल्यानंतर हत्येच्या आरोपात तिहार तुरुंगात असलेला सुशील कुमार भावुक झाला होता.
![Tokyo Olympics 2020: रवी दहियाचा सामना बघताना तिहार जेलमध्ये कुस्तीपटू सुशील कुमार भावुक Tokyo Olympics 2020 Wrestler Sushil Kumar got emotional after watching Ravi Dahiyas match today Tokyo Olympics 2020: रवी दहियाचा सामना बघताना तिहार जेलमध्ये कुस्तीपटू सुशील कुमार भावुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/05/abc9498af7be4e9516bf27bbb3b2ba82_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tokyo Olympics 2020: भारताचा रवी दहिया टोकियो ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात हरला असेल पण त्याने रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेला कुस्तीपटू सुशील कुमारही हा सामना पाहत होता आणि कारागृहातील उर्वरित कैदी त्याच्यासोबत पाहत होते.
तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी रवी दहिया पराभूत झाला तेव्हा सुशील कुमार भावुक झाला होता. त्याचे डोळे पाणावले होते. तिहार कारागृहातील खुल्या भागात कैद्यांना टीव्ही पाहण्याची सुविधा जेल प्रशासनाने पुरवली आहे. या मोकळ्या भागात सुशील कुमार इतर कैद्यांसोबत रवी दहियाचा सामना पाहत होता.
Ravi Dahiya Wins Silver: रवी कुमार दहियाची 'सुवर्ण'संधी हुकली, रौप्य पदकावर समाधान
वास्तविक, रवी दहियाने छत्रसाल स्टेडियमवर सुशील कुमार याच्या देखरेखीखाली कुस्तीचे अनेक डावपेच शिकले आहेत. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार दुपारपासून टीव्हीसमोर बसून होता. तो रवी दहियाचा अंतिम सामनाही बघत होता.
Video: पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कर्णधार मनप्रीतला फोन
देशासाठी रौप्य पदक जिंकले
रवी दहिया टोकियो ऑलिम्पिकमध्ये 57 किलो वजनाच्या कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचला. मात्र, त्याला सुवर्ण पदक जिंकता आलं नाही. रवी दहिया पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात रशियन ऑलिम्पिक समितीच्या विद्यमान विश्वविजेत्या जावूर युग्युएवकडून 4-7 ने पराभूत झाला. यामुळे देशातील सर्वात तरुण ऑलिम्पिक चॅम्पियन बनण्याचं त्याचं स्वप्न भंगलं. 23 वर्षीय दहिया यापूर्वी युगुएवकडून 2019 मध्ये जागतिक अजिंक्यपद जिंकण्यात अपयशी ठरले होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)