एक्स्प्लोर
Lionel Messi : लिओनेल मेस्सीचं स्वप्न साकार; 28 वर्षांनी कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटीनाचा विजय
(photo courtesy : @leomessi instagram)
1/9

अर्जेंटीनाने कोपा अमेरिका 2021 चा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघानं आर्क रायवल्स ब्राझीलचा 1-0 नं परभाव केला. (PHOTO : @leomessi instagram)
2/9

अर्जेंटीनाने जवळपास 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपलं नाव पटकावलं. यापूर्वी 1993 मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. (PHOTO : @leomessi instagram)
3/9

स्टार फुटबॉलर आणि अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात संघानं पहिल्यांदाच कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. (PHOTO : @leomessi instagram)
4/9

मेस्सीच्या नेतृत्त्वात संघानं जिंकलेली पहिली आतंरराष्ट्रीय ट्रॉफी आहे. (PHOTO : @leomessi instagram)
5/9

एंजल डि मारियाने 21व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल डागत संघाला विजय मिळवून दिला. अन् मेस्सीनं मारियाला कडकडून मिठी मारली. (PHOTO : @leomessi instagram)
6/9

यंदा कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना काहीसा खास ठरला. या अंतिम सामन्यात फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकाच मैदानात एकमेकांविरोधात खेळताना पाहण्याचं भाग्य या सामन्यात फुटबॉल प्रेमींना मिळालं. या सामन्यात मेस्सी आणि नेमार हे 2 फॉरवर्ड एकमेकांविरोधात मैदानावर उतरले होते. (PHOTO : @leomessi instagram)
7/9

ब्राझीलचा परभव झाल्यानंतर संघाचा स्टार खेळाडू नेमारला अश्रू अनावर झाले. यावेळी अर्जेंटीनाचा कर्णधार मेस्सीनं नेमारला मिठी मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (PHOTO : @leomessi instagram)
8/9

(PHOTO : @leomessi instagram)
9/9

(PHOTO : @leomessi instagram)
Published at : 11 Jul 2021 12:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण


















