Lakshya Sen Wins : थॉमस कपमध्ये भारत इतिहास रचण्याच्या तयारीत, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनकडून इंडोनेशियन खेळाडूचा पराभव
Lakshya Sen Wins : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं थॉमस कपच्या अंतिम फेरीत इंडोनेशियन खेळाडू गिंटिंगला पराभूत करत नवा इतिहास रचला आहे.
Lakshya Sen Wins Thomas Cup Mens Single : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) थॉमस कप (Thomas Cup) मुळे भारत इतिहास रचण्याच्या अगदी काही पाऊल दूर पोहोचला आहे. लक्ष्य सेननं अंतिम फेरीत इंडोनेशियन खेळाडू अँथॉनी गिंटिंगचा (Anthony Ginting) पराभव करत दमदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात इंडोनेशियन खेळाडू अँथनी सिनिसुका गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. या सामन्यात लक्ष्यने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एक तास पाच मिनिटांत विजय मिळवला. या विजयासह भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. येथे बेस्ट ऑफ 5 मध्ये पहिले तीन सामने जिंकणाऱ्या संघाला चॅम्पियन घोषित केलं जाईल.
74 वर्षांनंतर प्रथमच थॉमस कपमध्ये अंतिम सामना खेळणं ही भारतासाठी फोर मोठी गोष्ट आहे. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवत आधीच इतिहास रचला होता. मात्र, या इतिहासाचं शेवटचं पान लिहिणं अजून बाकी आहे. लक्ष्य सेनने थॉमस कपमधील सर्वात यशस्वी संघाविरुद्ध भारताला आवश्यक ती सुरुवात करून दिली आहे. सामना जिंकण्यासाठी प्रथम जोरदार आक्रमण करणं अत्यंत आवश्यक असते. भारतीय संघासाठी काम लक्ष्य सेननं चोख पार पाडलं आहे.
लक्ष्य सेनचा सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाचा शटलर अँथनी गिंटिंगसोबत होती. त्यामुळे हे काम सोपं नव्हतं. यामुळे गिटिंगचं पारडं काहीसं जड होतं. पण, शेवटी लक्ष्यनं आपली सर्व शक्ती पणाला लावत गिटिंगचा पराभव केला.
लक्ष्यने पुरुष एकेरीचा सामना जिंकला आहे. लक्ष्यचा विजय ही भारतासाठी मोठं पाऊल आहे. दुसरीकडे, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी सामना लढणार आहे. भारतीय जोडीचा सामना मोहम्मद अहसान आणि केविन संजय सुकामुल्जो यांच्याशी आहे. उपांत्यपूर्व फेरीत दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या