एक्स्प्लोर

Aishwarya Jadhav : कोल्हापुरी 'ऐश्वर्य' विम्बल्डनमध्ये झळकले! देशातून एकमेव निवड झालेल्या ऐश्वर्या जाधवच्या कामगिरीची देशात चर्चा!  

Aishwarya jadhav from kolhapur in wimbledon : 14 वर्षांखालील विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी देशातून एकमेव निवड झालेल्या कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला पराभव स्वीकारावा लागला.

Aishwarya Jadhav from kolhapur in wimbledon : 14 वर्षांखालील विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी देशातून एकमेव निवड झालेल्या कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तिने पहिल्याच प्रयत्नात दाखवलेला खेळ आणि आत्मविश्वास नक्कीच तिची भावी वाटचाल दाखवणारा आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या अॅन्ड्रिया सोरविरुद्ध तिला संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला.   

देशातून एकमेव निवड झालेली कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला विम्बल्डनमध्ये पराभव स्वीकारावा लागला, असला तरी  पण आत्मविश्वास तिचा चांगलाच दुणावला आहे. पहिल्या सेटमध्ये ऐश्वर्याने अॅन्ड्रियाविरुद्ध 3-0 अशा आघाडीवर होती, पण पुढे अॅन्ड्रियाने आक्रमक खेळ केल्याने ऐश्वर्या प्रतिकार थोडा कमकुवत ठरला आणि तिला 6-3,6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. 

पहिल्याच प्रयत्नात दमदार करून लक्ष वेधणाऱ्या ऐश्वर्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, खेळ चांगला झाला, पण दुर्दैवाने पराभव झाला, पण मी माझ्यासोबत घडलेल्या चांगल्या तसेच नकारात्मक बाबीही पाॅझिटिव्हपणे सोबत घेऊन जात आहे. विम्बल्डनमध्ये ग्रास कोर्टवर खेळण्याचा अनुभव सर्वोत्तम होता. मी पहिल्यांदाच ग्रासकोर्टवर खेळले. 

ऐश्वर्याची प्रशिक्षक अमृता बॅनर्जी यांनी सांगितले की, 14 वर्षांखालील विम्बल्डन अजिंक्यपदासाठी निवड झालेली कोल्हापूरची ऐश्वर्या ही एकमेव खेळाडू होती. स्पर्धेचा भाग होणे हे आमच्या सर्वात महत्त्वाचे होते. तिला या ठिकाणी पाहणे हा रोमांचकारी अनुभव होता. ऐश्वर्या सातत्याने ऐतिहासिक कामगिरी करत आहे. फॉर्ममध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 13 वर्षीय ऐर्श्वयाने अंडर-14 श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचण्याची कामगिरी केली आहे. 

दोन महिन्यांपूर्वी आयटीएफ जागतिक 14 वर्षाखालील मुलींची टेनिस स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत भारतीय संघातून सहभागी झालेल्या ऐश्वर्याने 4 सामने जिंकत सेमी फायनलला धडक मारली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर तिला विम्बल्डनचे तिकिट मिळाले. तिच्या निवडीनंतर 8 जूनला एबीपी माझाने बातमी दिली होती. 

ऐश्वर्या कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू आहे. ती छत्रपती शाहू विद्यालयात शिकते. ऐश्वर्याला प्रशिक्षक अर्षद देसाई, मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
IAS Success Story : अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
Milind Deora : काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही; मिलिंद देवरांचे वक्तव्य
काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : मिलिंद देवरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Narendra Modi Nanded : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नांदेडमध्ये जंगी स्वागतMilind Deora : काँग्रेस दलितविरोधी पक्ष; बाळासाहेबांना देखील मानत नाही - मिलिंद देवराSalman Khan Threat Call : लाॅरेन्स बिश्नोईचं नाव वापरून आणखी एक खोडसाळपणाABP Majha Headlines : 11 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
IAS Success Story : अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
Milind Deora : काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही; मिलिंद देवरांचे वक्तव्य
काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : मिलिंद देवरा
CSK vs LSG IPL 2024: धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
Embed widget