एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डेन्मार्क ओपनमध्ये किदंबी श्रीकांत चॅम्पियन, 37 वर्षांनंतर भारताचा झेंडा
श्रीकांतचं हे बॅडमिंटनच्या प्रीमियर सुपर सीरीजमधलं हे तिसरं विजेतेपद ठरलं. त्याने याच वर्षी इंडोनेशियन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.
ओडेंसी (डेन्मार्क) : भारताच्या किदंबी श्रीकांतने दक्षिण कोरियाच्या ली ह्यूनचा 21-10, 21-5 असा धुव्वा उडवून, डेन्मार्क ओपन सुपर सीरीजच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरीच्या फायनलवर इतकं निर्विवाद वर्चस्व गाजवलं की, त्याने ली ह्यूनला अवघ्या 25 मिनिटांत गाशा गुंडाळायला लावला. श्रीकांतचं हे बॅडमिंटनच्या प्रीमियर सुपर सीरीजमधलं हे तिसरं विजेतेपद ठरलं. त्याने याच वर्षी इंडोनेशियन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.
डेन्मार्क ओपनच्या 82 वर्षांच्या इतिहासात विजेतेपद मिळवणारा श्रीकांत दुसराच भारतीय आहे. 37 वर्षांपूर्वी भारताकडून खेळताना प्रकाश पदुकोण यांनी डेन्मार्क ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. महिलांमध्ये सायना नेहवालने 2012 साली हे विजेतेपद मिळवलं आहे.
या वर्षात सलग दोन सुपर सीरिज जिंकणारा श्रीकांत पहिलाच भारतीय खेळाडू आहे. तर वर्षात चार सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यांपर्यंत मजल मारणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement