एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताच्या किदंबी श्रीकांतला ऑस्ट्रेलिअन ओपनचं विजेतेपद
दिल्ली : भारताच्या किदंबी श्रीकांतला ऑस्ट्रेलिअन ओपन बॅडमिंटन सुपर सीरीजचं विजेतेपद मिळालं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सुपरसीरीजच्या फायनलमधे भारताच्या किदंबी श्रीकांतनं चीनच्या चेन लाँगचा पराभव केला.
किदंबी श्रीकांतनं चीनच्या चेन लाँगचा 22-20, 21-16 असा पराभव केला आहे. किदंबी श्रीकांतचं हे यावर्षातलं दुसरं विजेतेपद आहे. यापूर्वी इंडोनेशियन ओपन सुपरसीरीजही त्यानं जिंकला होता.
गेल्या पाच दिवसांमध्ये त्यानं जगज्जेत्या खेळाडूंना हरवलं आहे. दरम्यान, किदंबी श्रीकांतनं हरवलेल्या चेन लाँगने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. 24 वर्षीय किदंबी श्रीकांत हा गोपीचंदचा विद्यार्थी आहे. पी. व्ही. सिंधू, बी साईप्रणित यांच्यासह किदंबी श्रीकांत जागतिक पातळीवर कमालीची कामगिरी करताना दिसत आहे.
किदंबी श्रीकांतचे यापूर्वीचे विजय
2014 चायना ओपन सुपर सिरीज
2015 इंडिया ओपन सुपर सिरीज
2017 इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज
2017 ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज
किदंबी श्रीकांतचे ग्रांप्री विजेतेपद
2013 थायलंड ओपन सुपर सिरीज
2015 स्विस ओपन सुपर सिरीज
2016 स्येद मोदी ओपन सुपर सिरीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement