एक्स्प्लोर

Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला

Pune Election News : पुणे ही एखाद्या पक्षाची मक्तेदारी आहे असं पुणेकर मानत नाहीत, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे असं उदय सामंत म्हणाले.

पुणे : आपला पक्ष हा पुण्याच्या विकासावर बोलणारा आहे, तर त्यामुळे आपण कुणावरही टीका करायची नाही. टीका करण्याचं आपलं काम हे अजित पवार (Ajit Pawar) पूर्ण करत आहेत असा टोला उदय सामंत (Uday Samant) यांनी भाजपला लगावला. आपल्या मित्रपक्षाला वाटत होतं आपण उमेदवार उभे करू शकणार नाही, पण काही तासातच आपण 120 उमेदवार उभे केले. आता पुण्याचा महापौर आपल्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला. उदय सामंत यांनी पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला.

शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत आहे. आपल्या समोर धनशक्ती आहे, आम्ही कुणावर बोलत नाही किंवा एका पक्षाचे नाव आम्ही घेतलं नाही अशी टीका उदय सामंत यांनी नाव न घेता भाजपवर केली.

सगळीकडे आपलं वातावरण आहे. शिवसेनेला आशीर्वाद द्यायचं वातावरण पुण्यात आहे. उमेदवारांना माझी विनंती आहे, आपल्याला कुणावर टीका करायची गरज नाही, आपलं टीका करण्याचं काम अजित पवार पूर्ण करत आहेत. त्यामुळे आपल्याला काही बोलायची गरज नाही असं उदय सामंत म्हणाले.

Uday Samant Pune Speech : पुणेकरांचा आशीर्वाद शिवसेनेला

उदय सामंत म्हणाले की, "इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात 120 जागांवर लढत आहे. उमेदवारांचा आत्मविश्वास बघितल्यानंतर 16 तारखेला जो निकाल लागेल त्यावेळी महापौर बनवत असताना आपल्याला विचारात घ्यावंच लागेल अशी परिस्थिती आहे. पुणे शहर बाळासाहेबांचं आवडतं शहर होतं. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा."

उदय सामंत म्हणाले की, "संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. आपण घराघरांपर्यंत पोहोचू. तीन-तीन चार-चार वेळा लोकांच्या घरी जाऊ. काही नवे उमेदवार आपण दिले आहेत. 2004 मध्ये मी निवडणूक तरुण म्हणून लढलो होतो आणि त्यावेळी पराभव झाला होता. आज पाचवेळा मी आमदार झालो आहे. म्हणून जनता तरुणांच्या मागे असते."

Uday Samant On BJP : भाजपवर टीका

भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे ही टिकली पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. पण काही लोकांचा गैरसमज होता की, आम्ही 40 देखील उमेदवार उभे करू शकणार नाही. आम्हाला वेळ कमी पडला नाहीतर आपण 165 उमेदवार उभे केले असते असा टोला सामंत यांनी भाजपला लगावला.

समोरच्या लोकांनी टीका केली तर त्याला विकासातून उत्तर द्या. ही लढाई विकासाची आणि विश्वासघाताची आहे आहे. पुण्यात शिवसेनेची खरी ताकद काय आहे हे दाखवून द्या. पुढचे 14 दिवस अहोरात्र काम करा असं आवाहन सामंत यांनी शिवसैनिकांना केलं.

उदय सामंत म्हणाले की, "निवडणुकीचे सगळे निर्णय आपण एका तासात घेतले आहेत. पुण्यात जर आपण ताकद लावली तर एक नंबरचा पक्ष शिवसेना असेल. पण काही लोक कमी लेखत आहेत, त्यांच्यावरती बोलायला नको. आज अशी निवडणूक लढू की पाच वर्षात 165 पैकी 120 जागा आपण जिंकल्या पाहिजे."

यावर्षी महानगरपालिका पुणेकरांनी आमच्या ताब्यात द्यावी, कसा विकास होतो ते एकनाथ शिंदे साहेब दाखवून देतील. आपले मित्र पक्ष पत्रकार परिषद घेत आहेत, आपलं काम सोपं करत आहेत. पुणे ही एखाद्या पक्षाची मक्तेदारी आहे असं पुणेकर समजत नाहीत. ज्या ज्या ठिकाणी आज गेलो, तिथे लोकांनी सांगितलं की आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे.

ही बातमी वाचा:

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant: 'मी वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवतोय, पण..' तानाजी सावंतांना पुतण्या धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा
'मी वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवतोय, पण..' तानाजी सावंतांना पुतण्या धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा
Video: तेव्हा धनंजय महाडिक म्हणाले, 'काका माझं ऐकत नाहीत, तिथून वाद सुरू झाला' सतेज पाटलांकडून महाडिक-पाटील वादावर मोठं भाष्य
Video: तेव्हा धनंजय महाडिक म्हणाले, 'काका माझं ऐकत नाहीत, तिथून वाद सुरू झाला' सतेज पाटलांकडून महाडिक-पाटील वादावर मोठं भाष्य
Amravati News: अविश्वास ठरावामुळे सरपंचपद गेलं, तरीही गुलाल उधळत साजरा केला जल्लोष; नेमकं काय घडलं?
अविश्वास ठरावामुळे सरपंचपद गेलं, तरीही गुलाल उधळत साजरा केला जल्लोष; नेमकं काय घडलं?
इकडं संजय राऊत म्हणाले, तर मी भाजपचे देशात 15 तुकडे करून दाखवेन; तिकडं सतेज पाटील म्हणाले, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकणारा केडर किती असेल?
इकडं संजय राऊत म्हणाले, तर मी भाजपचे देशात 15 तुकडे करून दाखवेन; तिकडं सतेज पाटील म्हणाले, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकणारा केडर किती असेल?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले
Malad Railway station : लोकलमधून उतरण्यावरून वाद, धारदार शस्त्राने प्राध्यापकाला संपवलं
Sanjay Raut on Eknath Shinde Shivsena : पुढच्या निवडणुकीत शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanaji Sawant: 'मी वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवतोय, पण..' तानाजी सावंतांना पुतण्या धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा
'मी वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवतोय, पण..' तानाजी सावंतांना पुतण्या धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा
Video: तेव्हा धनंजय महाडिक म्हणाले, 'काका माझं ऐकत नाहीत, तिथून वाद सुरू झाला' सतेज पाटलांकडून महाडिक-पाटील वादावर मोठं भाष्य
Video: तेव्हा धनंजय महाडिक म्हणाले, 'काका माझं ऐकत नाहीत, तिथून वाद सुरू झाला' सतेज पाटलांकडून महाडिक-पाटील वादावर मोठं भाष्य
Amravati News: अविश्वास ठरावामुळे सरपंचपद गेलं, तरीही गुलाल उधळत साजरा केला जल्लोष; नेमकं काय घडलं?
अविश्वास ठरावामुळे सरपंचपद गेलं, तरीही गुलाल उधळत साजरा केला जल्लोष; नेमकं काय घडलं?
इकडं संजय राऊत म्हणाले, तर मी भाजपचे देशात 15 तुकडे करून दाखवेन; तिकडं सतेज पाटील म्हणाले, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकणारा केडर किती असेल?
इकडं संजय राऊत म्हणाले, तर मी भाजपचे देशात 15 तुकडे करून दाखवेन; तिकडं सतेज पाटील म्हणाले, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकणारा केडर किती असेल?
Nashik Accident News: नाशिकमध्ये भीषण अपघात, वाहनाच्या धडकेत मायलेकासह तिघे जखमी; संतप्त जमावाकडून कारची तोडफोड, PHOTO
नाशिकमध्ये भीषण अपघात, वाहनाच्या धडकेत मायलेकासह तिघे जखमी; संतप्त जमावाकडून कारची तोडफोड, PHOTO
Pune Crime News : नवऱ्याला सोडून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहायची, पतीने दागिने घ्यायला नम्रता-शाहरुखला बोलावलं अन्...; घटनेनं पुण्यात खळबळ
नवऱ्याला सोडून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहायची, पतीने दागिने घ्यायला नम्रता-शाहरुखला बोलावलं अन्...; घटनेनं पुण्यात खळबळ
किंग एडवर्ड ब्रिटिशांचं प्रतिक वाटतो, तर मुंबईत हेच लोढा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्पच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात, तो शब्द हटवावा; संजय राऊतांचा खोचक टोला
किंग एडवर्ड ब्रिटिशांचं प्रतिक वाटतो, तर मुंबईत हेच लोढा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्पच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात, तो शब्द हटवावा; संजय राऊतांचा खोचक टोला
Mumbai Crime Malad Railway station: मालाड रेल्वे स्थानकात आलोक सिंहला चाकू भोसकून संपवलं, वडील राजनाथ सिंहांच्या ताफ्यातील कमांडो, आरोपी ओंकार शिंदेचा जुना राग?
मालाड रेल्वे स्थानकात आलोक सिंहला चाकू भोसकून संपवलं, वडील राजनाथ सिंहांच्या ताफ्यातील कमांडो, आरोपी ओंकार शिंदेचा जुना राग?
Embed widget