एक्स्प्लोर
सिक्युरिटी गार्ड असलेल्या काश्मीरच्या खेळाडूची आयपीएलमध्ये निवड
किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं.
![सिक्युरिटी गार्ड असलेल्या काश्मीरच्या खेळाडूची आयपीएलमध्ये निवड Kashmir security guard majur dar brought by kxip in ipl 2018 सिक्युरिटी गार्ड असलेल्या काश्मीरच्या खेळाडूची आयपीएलमध्ये निवड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30095825/manjoor-dar-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : मोठमोठ्या 100 मीटरपेक्षाही अधिक षटकारांसाठी प्रसिद्ध असेलला काश्मीरचा क्रिकेटर मंजूर डारही यावेळी आयपीएलमध्ये खेळणार आहे. आयपीएलमध्ये खेळणारा तो दुसरा काश्मिरी क्रिकेटर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं.
किंग्ज इलेव्हन पंजाबने डारला खरेदी केल्यानंतर कुटुंबीयांमध्ये आणि घाटीत आनंदाचं वातावरण आहे. लोकांनी डारच्या निवडीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही मंजूर डारचं अभिनंदन केलं. आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मंजूर डार हा उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील सोनावारी भागातील रहिवासी आहे. नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-20 लीगमध्ये तो चमकला होता. याचाच फायदा त्याला झाला. मंजूर डार सिक्युरिटी गार्डचं काम करतो.
सिक्युरिटी गार्ड असलेला मंजूर डार रात्रीच्या वेळेला कर्तव्य बजावतो, तर दिवसा क्रिकेटच्या मैदानात घाम गाळतो. याच मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे.
घाटीमध्ये त्याला मंजूर पांडव या नावानेही ओळखलं जातं. त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचा प्रसिद्ध क्रिकेटर परवेज रसूल आणि गोलंदाज उमर नजीर यांना या लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही.
काश्मीरच्या उमर नजीरवरही एकाही फ्रँचायझीने बोली लावली नाही. मात्र मंजूर डारच्या निवडीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)