Jio Mumbai Cyclothon : मुंबईत रंगणार सायक्लोथॉन, विविध वयोगटातील सायकलपटू येणार मुंबईच्या रस्त्यांवर, कसा घ्याल सहभाग?
Cyclothon : महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनने मुंबई पोलिस, महानगरपालिका, एमएमआरडीए, एनसीबी, एमएसआरडीसी आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या भागीदारीने ही भव्य स्पर्धा आयोजित केली आहे.
Jio Mumbai Cyclothon : सध्या वाढत्या प्रदूषणात सायकलचा वापर अधिक करणं गरजेचं आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनने मुंबई पोलिस, महानगरपालिका, एमएमआरडीए, एनसीबी, एमएसआरडीसी आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या भागीदारीने एक भव्य अशी सायक्लोथॉन जिओ मुंबई सायक्लोथॉनच्या (Jio Mumbai Cyclothon) रुपात 13 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.
वांद्रे-कुर्ला कॉम्पेल्क्स अर्थात बीकेसी ते वरळी या मार्गे ही सायक्लोथॉन पार पडणार असून राजीव गांधी सागरी सेतू अर्थात सी लिंक सायक्लोथॉन पार पडणार आहे. मुंबई शहरातील अशा प्रकारची ही पहिलीच सायक्लोथॉन असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. पर्यावरणपूरक जीवनाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि सायकलिंग सारख्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या पर्यायांबद्दल त्यांना जाणीव करुन देणे हे या स्पर्धेचं उद्दिष्ट असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.
कसा घ्याल सहभाग?
सहभाग घेण्यासाठी सध्या ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. यावेळी 599 रुपयांपासून सायक्लोथॉनचे वेगवेगळ्या अंतरासाठी सहभाग घेता येऊ शकतो. यावेळी सर्वात आधी म्हणजे 5 किमीची जॉय राईड असणार आहे. यामध्ये फक्त 10 वर्षांखालील चिमुकल्यांसाठी आणि 10 वर्षांवरील सर्वांसाठी अशा दोन स्पर्धा असतील. तर 10 किमी, 25 किमी (फक्त महिलांसाठी), 50 किमी, 75 किमी आणि 100 किमी अशा वेगवेगळ्या अंतराच्या सायक्लोथॉन पार पडतील. तर सहभाग घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करु शकता..
लिंक-
सहभागी सायकलपटूंना मिळणार पुढील वस्तू
- सायकलिंग जर्सी
- चेस्ट नंबर
- 3D रंगीत पदक
- स्पोर्टिंग स्लिंग बॅग आणि हेल्दी वस्तू
- पोषक नाश्ता
- बॅकअप बॅन सपोर्ट
- पाण्याची सोय
- फ्रि फोटोज
- इ-टायमिंग सर्टिफिकेट
संशोधनातून समोर आले सायकलिंगचे फायदे?
18 ते 30 वयोगट आणि 65 ते 80 वयोगटातील 72 महिला आणि पुरुषांचा समावेशाने एक संशोधन करण्यात आलं. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींकडून हाय-इंटेसिटी ट्रेनिंगपासून वेट ट्रेनिंग, कंबाईन ट्रेनिंगसारख्या गोष्टी करवून घेतल्या. ज्यानंतर वाढत्या वयाची चिन्हं चेहरा किंवा शरीरावर प्रकर्षाने जाणवतात. त्यापासून बचाव करण्यासाठी 4 मिनिटांची सायकलिंग फायदेशीर आहे, हे समोर आलं. विशेष म्हणजे इतर औषधांपेक्षा सायकलिंग हा उपाय फलदायी आहे. ज्यांना वर्कआऊटसाठी फारसा वेळ मिळत नाही, अशांसाठी सायकलिंगचा पर्याय उत्तम मानला जातो आहे. हे संशोधन एका जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संशोधकांच्या माहितीनुसार, शॉर्ट बर्स्ट एक्सरसाईजमुळे शरीर तंदुरुस्त होतं. लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आणि डायबीटिजपासून दूर राहण्यासही सायकलिंगची मदत होते. (या संशोधनाबाबतची माहिची एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत)
हे देखील वाचा-