एक्स्प्लोर

WPL, Kiran Navgire : बॅटवर लिहिलं धोनीचं नाव अन् ठोकलं अर्धशतक, सोलापूरची किरण नवगिरे आहे तरी कोण?

WPL 2023: यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात युपीकडून दमदार अर्धशतक झळकावणारी किरण नवगिरेची आणि तिच्या खास बॅटची फार चर्चा होताना दिसत आहे.

GG vs UPW match : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत सर्वत सामने अगदी रोमांचक होत आहेत. UP वॉरियर्स संघानं 1 चेंडू शिल्लक असताना 170 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत गुजरात संघाला मात दिली. दरम्यान सामन्यात एक असं दृश्यही पाहायला मिळालं ज्याने सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. यूपी संघाची खेळाडू  किरण नवगिरे (Kiran Navgire) जेव्हा फलंदाजीसाठी उतरली तेव्हा बॅटवर महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा शॉर्ट फॉर्म MSD 07 असं लिहिल्याचं दिसून आलं.

या सामन्यात किरण नवगिरे फलंदाजीला आली तेव्हा संघाने 13 धावांत 1 गडी गमावला होता, तर 20 धावांवर यूपी संघाचे 3 गडी पॅव्हेलियनमध्ये परतले होते. अशा परिस्थितीत एका टोकापासून धावा काढण्याचं काम सुरू करत किरणने अवघ्या 43 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे यूपी वॉरियर्स संघाला सामन्यात परतण्याची संधी मिळाली. त्यानंतर ग्रेस हॅरिसने नाबाद अर्धशतक झळकावलं आणि सोफी एक्लेस्टोनने केवळ 12 चेंडूत 22 धावांची खेळी करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पण या सर्वात किरणचं अर्धशतक आणि तिची खास बॅट चर्चेत आली.

2011 पासून महेंद्रसिंग धोनीला करतेय फॉलो

किरण नवगिरेने डब्ल्यूपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी जिओ सिनेमावरील तिच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, 2011 मध्ये जेव्हा भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तेव्हापासून ती महेंद्रसिंग धोनीला फॉलो करायला सुरुवात केली. त्यावेळी मला महिला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नव्हती. मी तोपर्यंत फक्त पुरुषांनाच खेळताना पाहिले होते आणि गावातल्या मुलांशी खेळायला सुरुवात केली होती. असंही ती म्हणाली. तर किरण नवगिरे ही 27 वर्षीय महिला क्रिकेटर महाराष्ट्रच्या सोलापूरची आहे. ती सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नागालँड संघाकडून खेळते. किरणचे वडील शेतकरी आहेत, तर आई गृहिणी आहे. याशिवाय किरणला 2 भाऊही आहेत. किरणने 2022 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणि आतापर्यंत ती 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे.

सामन्याचा लेखा-जोखा

सामन्यात सर्वात आधी टॉस जिंकून गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी केली. त्यानुसार या संघाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 169 धावा केल्या आणि यूपी वॉरियर्स संघासमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले. गुजरात जायंट्सकडून हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. तिने 32 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने धावा केल्या. यूपी वॉरियर्सकडून गोलंदाजी करताना सोफी एक्लेस्टोन दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर अंजली आणि ताहिला यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.  

गुजरात जायंट्सने दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सच्या  ग्रेस हॅरिसने सर्वाधिक म्हणजे 26 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. यात तिने सात चौकार आणि तीन षटकार मारले. हॅरिसपाठोपाठ किरण नवगिरेने 43 चेंडूत 53 धावांची खेळी केली. यात तिने पाच चौकार आणि दोन षटकरा खेचले. त्याखालोखाल सोफी एक्लेस्टोनने ग्रेस हॅरिससोबत महत्वपूर्ण भागिदारी करत 12 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. यात तिने एक चौकार आणि एक षटकार खेचला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात  ग्रेस हॅरिसने 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारत एक चेंडून शिल्लक ठेवून हा सामना खिशात घातला. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget