WPL 2023 GG vs UPW : ग्रेस हॅरिसची दमदार फलंदाजी; यूपी वॉरियर्सचा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
WPL 2023 3rd Match UP Warriorz vs Gujarat Giants : डब्ल्यूपीएल 2023 मधील तिसऱ्या सामन्यात ग्रेस हॅरिसच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय मिळवला.
WPL 2023 3rd Match UP Warriorz vs Gujarat Giants : डब्ल्यूपीएल 2023 मधील तिसऱ्या सामन्यात ग्रेस हॅरिसच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय मिळवला. गुजरात जायंट्सने दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सने 19 षटके आणि पाच चेंडूत सात गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या. यात ग्रेस हॅरिसने दमदार फलंदाजी करत 26 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली.
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर खेळलेल्या या सामन्यात टॉस जिंकून गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी केली. त्यानुसार या संघाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 169 धावा केल्या आणि यूपी वॉरियर्स संघासमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले. गुजरात जायंट्सकडून हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. तिने 32 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने धावा केल्या. यूपी वॉरियर्सकडून गोलंदाजी करताना सोफी एक्लेस्टोन दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर अंजली आणि ताहिला यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.
गुजरात जायंट्सने दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सच्या ग्रेस हॅरिसने सर्वाधिक म्हणजे 26 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. यात तिने सात चौकार आणि तीन षटकार मारले. हॅरिसपाठोपाठ किरण नवगिरेने 43 चेंडूत 53 धावांची खेळी केली. यात तिने पाच चौकार आणि दोन षटकरा खेचले. त्याखालोखाल सोफी एक्लेस्टोनने ग्रेस हॅरिससोबत महत्वपूर्ण भागिदारी करत 12 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. यात तिने एक चौकार आणि एक षटकार खेचला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ग्रेस हॅरिसने 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारत एक चेंडून शिल्लक ठेवून हा सामना खिशात घातला.
तत्पूर्वी गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात जायंट्ससाठी सबभीनेनी मेघना आणि सोफिया डंकले या सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांचे योगदान दिले. ज्यानंतर सोफिया डंकले 11 चेंडूत 13 धावा काढून बाद झाली. तिला दीप्ती शर्माने बाद केले. त्यानंतर सबभीनेनी मेघना 24 (15), सुष्मा वर्मा 9(13), अॅनाबेल सदरलँड 8(10) आणि ऍशलेघ गार्डनर 25(19) धावांचे योगदान दिले. त्यामुळे गुजरातला निर्धारिक 20 षटकात सहा बाद 169 धावा केल्या.
अटीतटीच्या लढतीत हिरावला तोंडचा घास
यूपी संघाला स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची चांगली संधी होती आणि त्यांनी ती शेवटच्या काही षटकात मोठे फटके मारत शानदार विजय मिळवला. यात किरण आणि ग्रेस यांनी शानदार अर्धशतकं साजरी केली. गुजरातचा हा सलग दुसरा पराभव आहे. काल मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पहिल्याच समान्यात तब्बल 143 धावांनी धुव्वा उडला.