Virat Kohli : किंग कोहली पोहोचला बंगळुरुला, विराटच्या प्रॅक्सिस सेशनलाही चाहत्यांचा उत्साह अनावर, पाहा VIDEO
Bangalore vs Mumbai : आयपीएल 2023 ला काही दिवसांत सुरुवात होत असून बंगळुरुचा संघ पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.
![Virat Kohli : किंग कोहली पोहोचला बंगळुरुला, विराटच्या प्रॅक्सिस सेशनलाही चाहत्यांचा उत्साह अनावर, पाहा VIDEO Virat Kohli at the Chinnaswamy Stadium ahead of the RCB Unbox Event Fans cheering see video Virat Kohli : किंग कोहली पोहोचला बंगळुरुला, विराटच्या प्रॅक्सिस सेशनलाही चाहत्यांचा उत्साह अनावर, पाहा VIDEO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/26/77254f43a01cb65a5c271043f62658a21679833059358323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Royal Challengers Bangalore : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदा आयपीएल 2023 मध्ये कशी कामगिरी करतो ते पाहावं लागेलय. दरम्यान यंदाची आयपीएल होम आणि अवे अशा मोडमध्ये होणार असून सर्व चाहते आणखीच उत्सुक आहेत. दरम्यान आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा आगामी आयपीएलसाठी आपल्या होमग्राऊंड म्हणजेच एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु येथे पोहोचला असून तो सरावसत्रासाठी आला असताना प्रेक्षकांनी केलेला दंगा पाहण्याजोगा होता. या सर्वाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Kohli at the Chinnaswamy Stadium ahead of the RCB Unbox Event. pic.twitter.com/PtdkcWnlws
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 26, 2023
कशी असू शकते आरसीबीची प्लेईंग 11?
आरसीबीने यावेळी संघात काही बदल केले आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील युवा वेगवान गोलंदाज अविनाश सिंग आणि परदेशी खेळाडू रीस टोपले यांचा संघात समावेश केला आहे. हे दोघेही चांगले खेळाडू आहेत आणि संधी मिळाल्यावर ते चमकदार कामगिरी करू शकतात. त्याचबरोबर अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अजूनही दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे त्याच्या खेळाबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या व्यतिरिक्त, कदाचित संघातील सर्व खेळाडू उपलब्ध असतील. आरसीबीकडे ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहलीसारखे स्फोटक फलंदाज आहेत. हे दोन्ही खेळाडू सामन्याची स्थिती क्षणार्धात बदलण्यात माहीर आहेत. हे दोन्ही अनुभवी खेळाडू आरसीबीसाठी चमकदार कामगिरी करू शकतात. यासोबतच कॅप्टन डुप्लेसिसही चमत्कार दाखवू शकतो. मायकल ब्रेसवेल आणि रजत पाटीदार यांना संधी मिळाली तर तेही निराश करणार नाहीत. पाटीदारने गेल्या मोसमात चांगली फलंदाजी केली. संघाकडे मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. या दोघांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. तसंच दिनेश कार्तिक हा संघाचा फिनिशरही प्रभावशाली कामगिरी करु शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर/मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज
IPL 2023 चे काही नवीन नियम
निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.
नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.
फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)