(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WPL Final : महिला प्रीमियर लीगमध्ये IPL 2008 च्या इतिहासाची पुनरावृत्ती, हरमनप्रीतसमोर मोठं आव्हान
WPL Final 2023: IPL 2008 च्या इतिहासाची महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात पुनरावृत्ती होत आहे. कारण एक खास योगायोग यंदाही जुळून आला आहे.
WPL 2023, MI vs UPW: महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. या लीगमधील विजेतेपदाचा सामना 26 मार्च, रविवारी होणार आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामाची म्हणजेच IPL 2008 च्या इतिहासाची पुनरावृत्ती महिला IPL च्या पहिल्या सत्रातही होताना दिसत आहे. आयपीएल (2008) च्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधारासमोर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे आव्हान होते. आता महिला प्रीमियर लीगमध्येही तेच होत आहे.
भारतीय कर्णधारासमोर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे आव्हान
IPL 2008 मध्ये महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जची कमान सांभाळत होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. सध्या हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाची कर्णधार आहे आणि मेन लेनिंग महिला ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार आहे. अशा स्थितीत अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरसमोर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे आव्हान आहे.
आतापर्यंत WPL मध्ये हरमनप्रीत कौर आणि मेन लेनिंग यांच्याकडून उत्कृष्ट कर्णधारपद पाहायला मिळाले आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 8 पैकी 6-6 सामने जिंकले. पण चांगल्या नेट रनरेटमुळे, दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर राहिली आणि संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला यूपी वॉरियर्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागला. एलिमिनेटर सामन्यात मुंबईने 72 धावांनी दणदणीत विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाचा सामना कोण जिंकणार हे पाहावे लागेल. दोन्ही संघांमध्ये स्पर्धा आहे, अशा स्थितीत विजेतेपदाचा सामना खूपच रंजक असेल.
72 धावांनी मुंबई विजयी
प्रथम फलंदाजी करताना ब्रंटच्या 72 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारला. यात्सिका भाटिया हिने 21 तर हेली मॅथ्युज हिने 26 धावांचे योगदान दिले. हरमनप्रीत कौर 14 तर अमेलिया केर हिने 29 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून सोफियाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर अंजली सरवनी आणि पी चोप्रा हिने एक एक एक विकेट घेतली. मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युपीची सुरुवात निराशाजनक झाली. श्वेता शेरावत अवघ्या एका धावेवर तंबूत परतली. त्यानंतर ताहिला सात धावा काढून बाद झाली. त्याशिवाय एलिसा हेली 11 धावा काढून बाद झाली. किरन नवगिरे हिने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. ग्रेस हेरिस 14, दिप्ती शर्मा 16 यांनी छोटेखानी खेळी केली. पण इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. परिणामी युपीचा संघ 17.4 षटकात 110 धावांत सर्वबाद झाला. ज्यामुळे मुंबईचा संघ 72 धावांनी विजयी झाला.
हे देखील वाचा-