Vaibhav Suryavanshi Touching MS Dhoni Feet: वैभव सूर्यवंशीने पुन्हा मनं जिंकली; सामना संपल्यावर एमएस धोनी समोर येताच पाया पडला, VIDEO
Vaibhav Suryavanshi Touching MS Dhoni Feet: राजस्थानचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले.

Vaibhav Suryavanshi Touching MS Dhoni Feet: आयपीएल 2025 च्या हंगामात काल चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने सहा विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईसाठी यंदाचाही मोसम वाईट गेला. साखळीतील तेराव्या सामन्यातही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलचा शेवटचा सामना खेळत असलेल्या राजस्थानने चेन्नईचा 6 विकेटनी सहज पराभव करत आपला शेवट गोड केला. दरम्यान, या सामन्यात राजस्थानचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले.
चेन्नई आणि राजस्थानचा सामना संपल्यानंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते, तेव्हा एमएस धोनी आणि वैभव सूर्यवंशीही (Vaibhav Suryavanshi Touching MS Dhoni Feet) समोरासमोर आले. धोनी जवळ येताच, वैभवने हस्तांदोलन करत धोनीच्या पायांना खाली वाकून स्पर्श केला आणि त्याचे आशीर्वाद घेतले. यानंतर, धोनीने वैभवकडे प्रेमाने पाहत त्याचं कौतुक केलं आणि वैभवनेही निरागस स्मितहास्य दिलं, वैभवच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वैभव सूर्यवंशीने एमएस धोनीच्या पाया पडला, VIDEO:
VAIBHAV SURYAVANSHI TOUCHING MS DHONI'S FEET. 🥹
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 20, 2025
- A beautiful moment in the IPL. ❤️pic.twitter.com/Yrl5sbW7tR
सामना कसा राहिला?
चेन्नईने दिलेले 188 धावांचे लक्ष्य राजस्थानने केवळ 17.1 षटकात पूर्ण केले. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही आक्रमकपणे धावा काढल्या. यशस्वीने 19 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 36 धावा केल्या. यानंतर, वैभव सूर्यवंशीने कर्णधार संजू सॅमसनसह डावाला गती दिली. दोघांनी मिळून 10 षटकांत संघाचा धावसंख्या 65 धावांच्या पुढे नेला.वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी केली आणि केवळ 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने चार चौकार आणि चार षटकार मारत एकूण 57 धावा केल्या. सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर यांनी जबाबदारी घेतली आणि संयमी फलंदाजी करत संघाला विजयाकडे नेले. राजस्थानने 18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लक्ष्य गाठले. या विजयासह, राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर राहिला, तर चेन्नई शेवटच्या स्थानावर पोहोचला. चेन्नईचा अजूनही एक सामना बाकी आहे.
ब्रेव्हिस आणि शिवम दुबे यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि दोघांनीही 59 धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसने 42 धावा केल्या तर दुबेने 39 धावा केल्या.
संबंधित बातमी:
IPL 2025 : प्लेऑफ मॅचेसची ठिकाणं ठरली, आयपीएल फायनल 'या' मैदानावर होणार, BCCI नं केली मोठी घोषणा
















