IPL 2022 : उमरान मलिकच्या वेगानं हैदराबादची डोकेदुखी वाढवली, दोन सामन्यात दिल्या तब्बल 100 धावा
IPL 2022 Marathi News : आयपीएलच्या 15 व्या मोसमात अवघ्या 22 वर्षांच्या या युवा गोलंदाजानं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय.
Umran malik Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या मोसमात अवघ्या 22 वर्षांच्या या युवा गोलंदाजानं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. सुरुवातीला उमरान मलिक अनेकांच्या नजरेत भरला तो त्याच्या भन्नाट वेगामुळे. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाला खास पुरस्कार दिला जातो. सनरायझर्स हैदराबादच्या गेल्या आठ सामन्यात सलग आठ वेळा दीडशे किलोमीटर्सपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करून उमरान मलिकनं हा पुरस्कार पटकावलाय. पण आता उमरान मलिकचा हाच वेग हैदराबादसाठी डोकेदुखी ठरत आहे. होय... मागील दोन सामन्यात उमरान मलिकच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पडत आहे. उमरान मलिकची गोलंदाजी फोडून काढली.
मागील दोन सामन्यात उमरान मलिकच्या गोंलदाजीवर 100 पेक्षा जास्त धावा निघाल्या आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. या सामन्यात उमरान मलिकला एकही विकेट घेता आली नाही. उमरान मलिक याने आयपीएलमधील सर्वात वेगवान दुसरा चेंडू फेकला. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा तो पहिला भारतीय ठरला. पण उमरानच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पडत आहे. उमरान मलिकने दोन सामन्यात 100 धावा दिल्या आहेत. त्यामुळे हैदराबादसमोर चिंता वाढली आहे.
उमरान मलिकने मागील दोन सामन्यात 100 धावा खर्च केल्या आहेत. दिल्लीविरोधात उमरान मलिकने चार षटकात तब्बल 52 धावा खर्च केल्या. त्याआधी झालेल्या चेन्नईविरोधातील सामन्यात उमरान मलिकने 48 धावा खर्च केल्या होत्या. दोन सामन्यात उमरानने 100 धावा खर्च केल्या, त्याला एकही विकेट घेता आली नाही. वेगवान गोलंदाजीमुळे उमरान मलिक चर्चेत आहे, त्याचे कौतुकही केलं जातेय. पण उमरानची महागडी गोलंदाजीने हैदराबादची चिंता वाढवली आहे.
आयपीएलच्या 15 व्या हंगामात उमरान मलिकने दमदार कामगिरी केली होती. दोन सामन्यात उमरानला लय गवसली नाही. आतापर्यंत उमरान मलिकने दहा सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये एकदा चार आणि एकवेळा पाच विकेट घेतल्यात.