एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

IPL 2023 च्या दुसऱ्या सामन्यात उमेश यादवने रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

IPL 2023 Umesh Yadav : पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात उमेश यादवला फक्त एक विकेट घेता आली, पण एक मोठा विक्रम केला आहे.

IPL 2023 Umesh Yadav Bowling : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पंजाब किंग्सने (Punjab Kings) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knite Riders) सात धावांनी पराभव केला. हा दोन्ही संघांची आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिलात सामना होता. पंजाबनं (PBKS) विजयासह यंदाच्या मोसमाची सुरुवात. सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला, त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार, पंजाबचा सात धावांनी विजय झाला. या सामन्यात कोलकाताची (KKR) सुरुवात खराब झाली. पंजाबच्या अर्शदीपने भेदक गोलंदाजी करत तीन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. याउलट कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज उमेश यादव याला एकच विकेट घेता आली. असं असलं तरी, त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

उमेश यादवने नावावर केला नवा विक्रम

पंजाब किंग्स विरोधात गोलंदाजी करताना उमेश यादवने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League 2023) इतिहास रचला आहे. उमेश यादवने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चार षटकात 27 धावा देऊन एक गडी बाद केला. यासह उमेश यादव आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध उमेशने एकूण 34 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2013 मध्ये पंजाबविरुद्ध पहिला सामना खेळला होता. नव्या विक्रमासह सर्वाधिक विकेट घेत उमेशने ड्वेन ब्राव्होला मागे टाकलं आहे. ब्राव्होने मुंबई इंडियन्सविरुद्ध 33 विकेट घेतल्या होत्या.

2010 पासून खेळतोय आयपीएल

उमेश यादव 2010 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 134 सामन्यांत 136 विकेट घेतल्या आहेत. उमेश फॉर्ममध्ये असल्यास कोणत्याही आक्रमक फलंदाजीला फाटा देऊ शकतो. तो डावाच्या सुरुवातीला शानदार गोलंदाजी करतो. आयपीएल 2022 मध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 12 सामन्यात 16 विकेट घेतल्या.

पंजाबविरुद्ध कोलकाताची खराब सुरुवात

पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. कोलकाताने अवघ्या 29 धावांत तीन विकेट गमावल्या. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य दिले होते. पंजाबच्या तगड्या गोलंदाजीमुळे कोलकाता खराब सुरुवात झाली. कोलकाताची धावसंख्या सात विकेट्सवर 146 अशी असताना पावसाला सुरुवात झाली खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबचा सात धावांनी विजय झाला. अर्शदीपने तीन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PBKS vs KKR IPL 2023 : अर्शदीप सिंहचं 'बल्ले बल्ले'! कोलकातावर भेदक गोलंदाजीचा झंझावात, नावावर केला नवा विक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget