एक्स्प्लोर

jaro institute ipo gmp : जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या आयपीओला दमदार प्रतिसाद, IPO चा GMP कितीवर पोहोचला?

jaro institute ipo : जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आयपीओ 23 सप्टेंबरला खुला झाला आहे. हा आयपीओ सबस्क्राईब करण्याचा शेवटचा दिवस आहे.

मुंबई : जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीजचा आयपीओ सबस्क्राईब करण्याचा शेवटचा दिवस आहे. आयपीओ सबस्क्राईब करण्याची सुरुवात 23 सप्टेंबरला झाली होती. तर, 25 सप्टेंबर म्हणजेच आयपीओ सबस्क्राईब करण्याची मुदत संपणार आहे. जारो कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून 450 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे. या कंपनीचा आयपीओ नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर  लीस्ट होणार आहेत. जारोचा आयपीओ 10 पट सबस्क्राईब झाला आहे.

जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी 450 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारणार आहे. आयपीओद्वारे कंपनी नवे शेअर आणि जुन्या शेअरची विक्री केली जाणार आहे. जारो कंपनी 170 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी करणार आहे. तर ऑफर फॉर सेलद्वारे 280 कोटी रुपयांच्या शेअरची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री करणार आहे. 

कंपनीनं जारी केलेल्या डीआरएपचीनुसार प्रमोटर संजय नामदेव साळुंखे यांच्याकडे कंपनीचे 78.2 टक्के शेअर आहेत. ते ऑफर फॉर सेलद्वारे 400 कोटींचे शेअर विकून त्यांचा वाटा कमी करणार आहेत.  नव्या शेअरची विक्री करुन कंपनीला जे पैसे मिळतील त्यातून कर्जाची परतफेड, मार्केटिंग, ब्रँड बिल्डींग आणि जाहिरात यासाठी वापरले जातील. 

जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या आयपीओचा किंमतपट्टा 846 ते 890 रुपये निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये 16 शेअर असतील. एका लॉटसाठी 14240 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.   

आयपीओ अलॉटमेंट 26 सप्टेंबर रोजी निश्चित केली जाऊ शकते. त्यानंतर शेअर आयपीओ ज्यांना अलॉट केला आहे, त्यांच्या डीमॅट खात्यात 29 सप्टेंबरला अलॉट केले जातील.  यानंतर 30 सप्टेंबरला आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल. 

jaro institute ipo gmp : जारो आयपीओचा जीएमपी कितीवर?

जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या आयपीओचा किंमतपट्टा 846 ते 890 रुपयांदरम्यान आहे. इन्वेस्टरग्रेन वेबसाईटनुसार आयपीओचा जीएमपी 23 सप्टेंबरच्या तुलनेत कमी होऊन 961 रुपयांवर पोहोचला आहे.

जारो एज्युकेशनची स्थापना 2009 मध्ये संजय साळुंखे यांनी केली होती. ते कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. नामांकित शिक्षण संस्थांसोबत मिळून जार कडून तंत्रज्ञान केंद्रीत डिग्री कोर्सेस आणि प्रमाणपत्रक कोर्सेस चालवले जातात 31 मार्च 2024 च्या माहितीनुसार जारो एज्युकेशनची भारतातल्या महत्त्वाच्या शहरात 22 कार्यालयं आहेत. तर आयआयएममध्ये 15 स्टुडिओज आहेत. याशिवाय इतर शैक्षणिक संस्थांसोबत करार केले आहेत.    

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
Income Tax Return: आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, आयटीआर-1 फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget