एक्स्प्लोर

PBKS vs KKR IPL 2023 : अर्शदीप सिंहचं 'बल्ले बल्ले'! कोलकातावर भेदक गोलंदाजीचा झंझावात, नावावर केला नवा विक्रम

IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात विजयी सुरुवात केली आहे. अर्शदिपने तीन विकेट घेत या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Punjab Kings vs Kolkata Knight Riders : आयपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knite Riders) विरोधात विजयी सुरुवात केली. मोहालीत झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या पंजाब (PBKS) संघाने कोलकाताचा (KKR) सात धावांनी पराभव केला. पंजाब किंग्सने डकवर्थ लुईस नियमानुसार कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पंजाब संघाने यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. पंजाबच्या विजयाचा खरा हिरो ठरला अर्शदीप सिंह (Arshdeep Singh). त्याने भेदक गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या.

अर्शदीप सिंहचं 'बल्ले बल्ले'

कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. कोलकाताने अवघ्या 29 धावांत तीन विकेट गमावल्या. अर्शदीप सिंहने पहिल्याच षटकात मनदीप सिंह (2) आणि अनुकुल रॉय (4) यांना बाद केलं. अर्शदीपने तीन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले.

पंजाबच्या विजयात सिंहाचा वाटा, घेतल्या तीन विकेट

पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य दिले होते. पंजाबच्या तगड्या गोलंदाजीमुळे कोलकाता खराब सुरुवात झाली. कोलकाताची धावसंख्या सात विकेट्सवर 146 अशी असताना पावसाला सुरुवात झाली खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबचा सात धावांनी विजय झाला. 

टी-20 मध्ये अर्शदीपच्या 100 विकेट्स

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात कोलकाताचे तीन गडी बाद करत अर्शदीपने तुफान कामगिरी केली. यासोबतच त्याने आणखी एक विक्रम केला आहे. अर्शदीपने टी-20 मधील 100 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. अर्शदीपने टी-20 मध्ये 100 गडी बाद केले आहेत. 

भानुका राजपक्षेची अर्धशतकी खेळी

भानुका राजपक्षेने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राजपक्षेने अवघ्या 32 चेंडूत 50 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. राजपक्षेने कर्णधार शिखर धवनसोबत 80 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. शिखर आणि राजपक्षे यांनी मोठ्या धावसंख्येचा पल्ला गाठला.

शिखर धवनची संयमी खेळी

कर्णधार शिखर धवन याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. एका बाजूला प्रभसिमरन, राजपक्षे आणि जितेश शर्मा धावांचा पाऊस पाडत होते. तेव्हा धवन याने दुसरी बाजू लावून धरली होती. धवन याने संयमी 40 धावांची खेळी केली. धवन याने 29 चेंडूत 40 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार लगावले.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

PBKS vs KKR, IPL 2023: पंजाबचं बल्ले बल्ले, कोलकात्यावर सात धावांनी विजय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Embed widget