एक्स्प्लोर

Top 10 Key Points : राहुलची अर्धशतकी खेळी व्यर्थ, लखनौचं आव्हान संपलं, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

IPL 2022 : आरसीबीचा क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश झालाय..तेथे त्यांचा सामना राजस्थानसोबत होणार आहे.

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminator IPL 2022 : रजत पाटीदारची शतकी खेळी आणि त्यानंतर जोश हेजलवूडचा भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीने लखनौचा 14 धावांनी पराभव केलाय. आरसीबीने 208 धावांचा बचाव करताना लखनौच्या संघाला 193 इतख्या धावांत रोखले. यासह आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. तर लखनौचं आव्हान संपुष्टात आलेय. क्वालिफायर 2 मध्ये आरसीबी आणि राजस्थान यांचा सामना होणार आहे. 

208 धावांचा पाठलाग करताना राहुल आणि दीपक हुड्डाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. राहुलची 79 आणि दीपक हुड्डाची 45 धावांची झुंज व्यर्थ केली.. दोघांची खेळी लखनौला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

जोश हेजलवूडने भेदक मारा करत लखनौच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले.. तसेच मोक्याच्या क्षणी राहुलला 77 धावांवर बाद केले. 

लखनौचा कर्णधार केएल राहुलने करो या मरोच्या सामन्यात नाणेफेक जिंकली.. राहुलने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते..

करो या मरोच्या सामन्यात लखनौ आणि आरसीबी संघात बदल करण्यात आले. लखनौ संघात दोन तर आरसीबीने आपल्या संघात एक बदल होता. लखनौने कृष्णप्पा गौतम आणि जेसन होल्डरला वगळले. त्यांच्याजागी क्रृणाल पांड्या आणि दुष्मंता चमिराला स्थान देण्यात आलेय. आरसीबीने मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले. सिद्धार्थ कौलला आरसीबीने वगळले. 

एलिमेनटर सामना सुरु होण्याआधी ईडन गार्डनवर पावसाने हजेरी लावली... धो धो पाऊस पडल्यामुळे सामना उशीराने सुरु झाला.. नाणेफेकीला आणि सामना सुरु होण्यास विलंब झाला... पाऊस पडल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होते... मैदान संथ झाले होते.

रजत पाटीदारच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला.  

प्रथम फंलदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिस गोल्डन डकचा शिकार झाला... विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरला.. विराट कोहलीने 24 चेंडूत संयमी 25 धावांची खेळी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर लागोपाठ बाद झाले... 

रजत पाटीदार आणि अनुभवी दिनेश कार्तिकने विस्फोटक फलंदाजी केली. दोघांनी अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला. त्यांनी अखेरच्या तीस चेंडूत 80 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 92 धावांची भागिदारी केली.

एलिमेनटर सामन्यात रजत पाटीदारने वादळी खेळी करत शतक झळकावले.. पाटीदारने अवघ्या 49 चेंडूत शतक झळकावले... एका बाजूला विकेट पडत असताना पाटीदारने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला.. पाटीदारने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला... प्लेऑफच्या सामन्यात शतक झळकावणारा रजत पाटीदार पहिला अनकॅप खेळाडू आहे. रजत पाटीदारने सात षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामातील पाटीदारचे सर्वात वेगवान शतक ठरलेय.. 

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानी पोहचलाय.  विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा  आरोन फिंचला मागे टाकले. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम वेस्ट विंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. तर भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 341 सामन्यात 10590 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीने टी20 मध्ये आतापर्यंत पाच शतके आणि 78 अर्धशतके झळकावली आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget