रिद्धिमान साहाला धमकी देणं पत्रकार बोरिया मझूमदारला पडलं महाग; बीसीसीआयने केली कडक कारवाई
BCCI Update : रिद्धिमान साहाला धमकी दिल्यामुळे प्रसिद्ध पत्रकार बोरिया मजूमदारवर बीसीसीआयने कडक कारवाई करत त्याच्यावर दोन वर्षांचा प्रतिबंध लावण्यात आला आहे.
BCCI : भारतीय क्रिकेटमधील एक वरिष्ठ खेळाडू रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला पत्रकार बोरिया मझूमदार (Boria Majumdar) याने धमकावल्याची बातमी काही काळापूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता बीसीसीआयने मझुमदारवर कडक कारवाई केली आहे. बीसीसीआयने पत्रकार बोरिया मझुमदारवर दोन वर्षांचा बॅन लावण्याचा आदेश जारी केला आहे. याआधी बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्याकरता तीन सदस्यीय समिति गठीत केली होती. ज्यामध्ये उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण धूमल आणि शीर्ष परिषद सदस्य प्रभतेज भाटिया यांचा समावेश होता.
ट्वीट करत साहाने केला होता खुलासा
23 फेब्रुवारी रोजी साहाने एक ट्वीट करत या सर्व प्रकरणाचा खुलासा केला होता. वृद्धीमान साहानं पत्रकारासोबत झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट काढून ट्विटवर शेअर केला होता. ज्यात पत्रकार त्याला म्हणतोय की, “तू माझ्यासोबत एक मुलाखत करशील. ते चांगले होईल. निवडकर्त्यांनी केवळ एकाच यष्टीरक्षकाची संघात निवड केलीय. सर्वोत्तम कोण आहे? तू 11 पत्रकारांची निवड करण्याचा प्रयत्न केला, जो माझ्या मते योग्य नाही. सर्वात जास्त मदत करू शकेल अशा एकाची निवड कर. तू कॉल केला नाहीस मी तुझी यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही आणि मी ते लक्षात ठेवीन,” असंही पत्रकारानं त्याला म्हटलं होतं. हा पत्रकार म्हणजे बोरिया मझुमदार असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. त्यावेळी सेहवाग, हरभजन अशा अनेकांकडून साहाच्या ट्वीटबाबत समर्थन मिळालं होतं.
हे देखील वाचा-
- Virat Kohli New Look: क्रिकेटर आहे की हॉलिवूडचा अभिनेता? विराट कोहलीच्या नव्या लूकवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया
- RCB Vs CSK Probable XI: बंगळुरूला पुन्हा हरवण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
- IPL Purple Cap 2022: पर्पल कॅपची स्पर्धा रोमांचक स्थितीत, 'या' पाच गोलंदाजांचं एकमेकांना मोठं आव्हान