T20 WC: भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; BCCIनं ट्विट करत दिली माहिती
यूएई (UAE) आणि ओमानमध्ये सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची (Team India) नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे.
![T20 WC: भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; BCCIनं ट्विट करत दिली माहिती team india new official jersey for t20 world cup 2021- T20 WC: भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; BCCIनं ट्विट करत दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/13/072b06109a84b224dd46f2a1aaf5a5e3_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Team India new jersey: यूएई (UAE) आणि ओमानमध्ये सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची (Team India) नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) आज (13 ऑक्टोबर) ट्वीट करून भारतीय क्रिकेट संघ नवी जर्सी लाँच केली आहे. बीसीसीआयने ट्वीटमध्ये लिहीले, 'बिलियन चीयर्स जर्सी सादर करत आहोत' बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू दिसत आहेत.
बीसीसीआयने आज होणाऱ्या भारतीय संघाच्या नव्या जर्सीच्या लाँचबद्दल माहिती दिली होती. भारतीय संघाची ही नवी जर्सी जुन्या जर्सीपेक्षा थोडी वेगळी आहे. आत्तापर्यंत भारतीय संघ जी जर्सी परिधान करत होता ती निळ्या रंगाची होती, ही नवी जर्सी देखील निळ्या रंगाची आहे परंतु यावरील डिझाइन थोडी वेगळी आहे. या जर्सीवर निळ्यारंगाचे पट्टे दिसत आहेत.
Presenting the Billion Cheers Jersey!
— BCCI (@BCCI) October 13, 2021
The patterns on the jersey are inspired by the billion cheers of the fans.
Get ready to #ShowYourGame @mpl_sport.
Buy your jersey now on https://t.co/u3GYA2wIg1#MPLSports #BillionCheersJersey pic.twitter.com/XWbZhgjBd2
24 ऑक्टोबर रोजी होणार पहिला सामना
भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी टी20 वर्ल्ड कपची पहिला सामना खेळेल. हा सामना पाकिस्तान विरोधात असेल. दोन वर्षानंतर पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेट संघ आमने- सामने येणार आहेत. पाकिस्ताननंतर भारत 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अबू दाबीमध्ये भारत अफगाणिस्तान विरोधात सामना खेळेल.
संबंधित बातम्या:
Rishabh Pant Captaincy: ऋषभ पंतची कमाल; ठरला नऊ वर्षातील इतिहासातला सर्वश्रेष्ठ कर्णधार
ICCकडून T20 World Cup पुरस्काराच्या रकमेची घोषणा, विजेत्यांना मिळणार कोट्यवधींची रक्कम
DC vs CSK: चेन्नईकडून पराभवानंतर ऋषभ पंत म्हणाला, मी निशब्द झालोय,पण...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)