ICCकडून T20 World Cup पुरस्काराच्या रकमेची घोषणा, विजेत्यांना मिळणार कोट्यवधींची रक्कम
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) नं 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या T20 World Cup 2021 च्या पुरस्काराच्या रकमेची घोषणा केली आहे.
ICC 2021 T20 World Cup Prize Money: इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) नं 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या T20 World Cup 2021 साठी पुरस्कारांची घोषणा केली आहे. आयसीसीनं सांगितलं की, विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला 16 लाख डॉलर (12 कोटी रुपये) पुरस्काराची रक्कम मिळणार आहे तर उपविजेता संघाला 8 लाख डॉलर ( 6 कोटी रुपये) मिळणार आहेत.
आयसीसीनं सांगितलं की, सेमीफायनल सामन्यात पराजित होणाऱ्या संघांनाही तीन तीन कोटी रुपये दिले जाणार आहेत. आयसीसीने सुपर 12 स्टेजमध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला बोनस दिला जाणार आहे. 2016 च्या टी20 विश्वचषकाप्रमाणं 2021 टी20 विश्वचषकात देखील सुपर 12 स्टेजमध्ये प्रत्येक सामन्यासाठी एक बोनस रक्कम दिली जाणार आहे.
टी 20 विश्वचषकात पहिल्यांदाच होणार DRS चा उपयोग
आयसीसीनं सांगितलं आहे की, पुरुषांच्या टी20 विश्वचषकात प्रत्येक सामन्यात दोन ड्रिंक्स ब्रेक घेतले जाणार आहेत. हे ब्रेक अडीच मिनिटांचे असतील. सोबतच DRSचा उपयोग देखील यंदा पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये केला जाणार आहे. प्रत्येक संघाला सामन्यात दोन डीआरएस वापरता येणार आहेत.
आयसीसी (ICC) टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) चं आयोजन 17 ऑक्टोबरपासून (Oman) आणि यूएई (UAE)मध्ये केलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय (BCCI) ने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी यंदा टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचा दावा केला आहे. टी20 विश्वचषकाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत.
टी20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.