(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Tripathi: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर घोंगावलं राहुल त्रिपाठी नावाचं वादळ, कोलकात्याच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडत रचले अनेक विक्रम
IPL 2022: आयपीएल 2022 च्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने आले होते. या सामन्यात सनरायझर्सच्या संघानं सात विकेट्स राखून विजय मिळवला आहे.
IPL 2022: आयपीएल 2022 च्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders) आमने सामने आले होते. या सामन्यात सनरायझर्सच्या संघानं सात विकेट्स राखून विजय मिळवला आहे. हैदराबादकडून राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आणि एडिन मार्कराम यांनी शानदार खेळी केली. या सामन्यात राहुलनं 71 धावांची तुफानी खेळी केली. या कामगिरीसह राहुल त्रिपाठीनं आपल्या नावावर खास विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएल 2022 मध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. यासह अनकॅप्ड प्लेयर म्हणूनही त्यानं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
कोलकाता विरुद्ध खेळण्यात आलेल्या मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर राहुल त्रिपाठीनं चमकदार कामगिरी केली. त्यानं 37 चेंडूत 71 धावा कुटल्या. ज्यात सहा षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे. या सामन्यात राहुल त्रिपाठीनं 21 चेंडूत अर्धशतक ठोकलं. या हंगामातील सर्वात जलद दुसरं अर्धशतक ठरलं आहे. या हंगामात पॅट कमिन्सनं सर्वाधिक जलद दुसरं अर्धशतक ठोकलं होतं. त्यानं मुंबईविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकून कोलकात्याला विजय मिळवून दिला होता. याशिवाय, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत राहुल त्रिपाठी चौथा फलंदाज ठरला आहे.
आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक मारणारे अनकॅप्ड खेळाडू-
1) इशान किशन- 17 चेंडू
2) यशस्वी जैस्वाल- 19 चेंडू
3) दीपक हुडा- 20 चेंडू
4) राहुल त्रिपाठी- 21 चेंडू
आयपीएलमधील 2021 मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे खेळाडू-
1) पॅट कमिन्स-14 चेंडू (कोलकाता नाईट रायडर्स)
2) राहुल त्रिपाठी- 21 चेंडू (राजस्थान रॉयल्स)
3) लियाम लिव्हिंगस्टोन- 21 चेंडू (पंजाब किंग्ज)
4) इविन लुईस- 23 चेंडू (लखनौ सुपर जायंट्स)
5) जोस बटलर- 23 चेंडू (राजस्थान रॉयल्स)
हे देखील वाचा-