IPL 2023 : राशिद की सूर्यकुमार, खरा सामनावीर कोण? सोशल मीडियावर लागला वाद
Man of the match : मुंबईने वानखेडे मैदानावर गुजरातचा पराभव केला. आजचा सामना सूर्यकुमार यादव आणि राशिद खान यांनी गाजवला.
Suryakumar Yadav Rashid Khan Man of the match : मुंबईने वानखेडे मैदानावर गुजरातचा पराभव केला. आजचा सामना सूर्यकुमार यादव आणि राशिद खान यांनी गाजवला. सूर्यकुमार यादव याने शतकी खेळी केली. तर राशिद खान याने अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केलेय. सोशल मीडियावर सामनावीर कोण? यावरुन मिम्स अन् पोस्टचा पाऊस पाडलाय. २१९ धावांचा पाठलाग करताना गुजरातचा डाव गडगडला होता. १०० धावांत गुजरातचे सहा फलंदाज बाद झाले होते. त्यावेळी राशिद खान धावून आला. त्याने एकट्याने झुंज दिली. राशिद खान याने गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करताना नाबाद ७९ धावांची खेळी केली. राशिद खान एकटा मुंबईच्या संघाला नडला... राशिदच्या वादळी खेळीपुढे सूर्यकुमार यादवाची खेळीही फिकी पडली, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. राशिद खान याने आपल्या खेळीत तब्बल दहा षटकार लगावले...राशिद याच्या खेळीमुळे मुंबईच मोठ्या विजयाच्या मनसुब्यावर पाणी फेरले.. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला राशिद खानला बाद करता आले नाही. २४ वर्षीय राशिद खान याचे हे आयपीएलमधील पहिले अर्धशतक होय.
सूर्यकुमार यादव यानेही वादळी खेळीचे प्रदर्शन केले. सूर्यकुमार यादव याचे फटके दर्जेदार होते. सूर्याच्या फटक्यावर सचिन तेंडुलकही फिदा झाला होता. सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीमुळेच मुंबईने २१८ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईने सामन्यात बाजी मारल्यानंतर सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावरुन सोशल मीडियात काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूर्यकुमार यादवची खेळी चांगली होती.. पण राशिद खान याची कामगिरी त्याच्यापेक्षा चांगली होती. राशिद खान सामनवीर पुरस्काराचा खरा हक्कदार आहे.. यासारख्या पोस्टचा धुमाकूळ होतोय. खरा सामनावीर कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय.
पाहा सोशल मीडियावर कोण काय म्हणतेय..
Sorry Surya Kumar Yadav but Rashid Khan has to be the Man of the match today, 4 wickets and 80+ runs with a SR of 246.85 , The greatest T20 Allrounder of all time. Almost ruined the happiness for MI even in victory #MIvsGT #RashidKhan #Suriya pic.twitter.com/KaYdn8K513
— AFTAB (@aftab169) May 12, 2023
Rashid Khan is my man of the match for tonight! What an incredible all round performance #MIvGT @rashidkhan_19 👏
— S.Badrinath (@s_badrinath) May 12, 2023
#Rashidkhan deserves Man of the Match, even in losing cause! Rashid khan saved runrate loss!#MIvsGT #IPL2023 #SuryakumarYadav #Surya #MumbaiIndians pic.twitter.com/n36lLagS72
— S H I V (@Batman64204217) May 12, 2023
Whatta play @rashidkhan_19 10 sixes, you made sky innings a big joke.
— Suresh samy (@sureshsamy28) May 12, 2023
Massive innings GT looks absolute sold
For me you’re the man of the match pic.twitter.com/DlFujhcOqQ
Rashid Khan is truly a fighter. He really deserves man of the match award for his brilliant innings.👏👏👍👍#MIvsGT pic.twitter.com/2Zggrmd4zu
— Manish Yadav 🇮🇳 (@ManishYdvDU) May 12, 2023
Sorry Surya Kumar Yadav but Rashid Khan has to be the Man of the match today, 4 wickets and 80+ runs with a SR of 246.85 , The greatest T20 Allrounder of all time. Almost ruined the happiness for MI even in victory #RashidKhan #Surya #SuryakumarYadav #GTvsMI pic.twitter.com/m7gjmfh7C3
— Akshay Kumar (@AkshayK63721592) May 12, 2023
Sorry Suryakumar Yadav 🙏🏿 but
— ` Frustrated CSKian (@kurkureter) May 12, 2023
Rashid Khan should get man of the match, first took 4fer on road like pitch & then made brill6 fifty from difficult situation👏
Whattta circketer @rashidkhan_19
Rashid Khan is truly a fighter. He really deserves man of the match award for his brilliant innings.👏👏👍👍#MIvsGT pic.twitter.com/8uaSk2dMSF
— Sachin Jerry (@jerrysachin219) May 12, 2023
What a man, What a player
— Sam: Mahirat❣️ (@im_possible1711) May 12, 2023
Absolutely Brilliant🔥
He should definitely be today’s Man of the Match!!#RashidKhan pic.twitter.com/7wRxue6GQ0
Take a bow to Rashid Khan
— Zubair Fans Club (@ZubairFansClub0) May 12, 2023
For me #RashidKhan Man of the match ✨#MIvsGT #IPL2023 pic.twitter.com/tppymUuOSI
राशिद खानची अष्टपैलू खेळी -
राशिद खान याने अल्जारी जोसेफ याला हाताशी धरत गुजरातचा मोठा पराभव टाळला. राशिद खान याने ३२ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दहा षटकार लगावले.. त्याशिवाय तीन चौकारही मारले.. राशिद खान याने अल्जारी जोसेफ याच्यासोबत ४० चेंडूत ८८ धावांची भागिदारी केली. नवव्या विकेटसाठी या दोघांनी तब्बल ८८ धावा जोडल्या. यामध्ये राशिद खान याचे योगदान ७७ धावांचे होते. तर अल्जारी जोसेफ सात धावांचे योगदान होते. राशिद खान याच्या वादळी खेळीमुळे गुजरातचा मोठा पराभव टळला. तर गोलंदाजीतही राशिद याने भेदक मारा केला. वानखेडे मैदानावर राशिद खान याने भेदक गोलंदाजी केली. राशिद खान याने अघ्या चार षटकात ३० धावांच्या मोबद्लयात चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. राशिद खान याने मुंबईच्य सलामी फलंदाजांना तंबूत पाठवले. रशिद खान याने रोहित शर्मा, ईशान किशन, नेहल वढेरा आणि टिम डेविड यांना तंबूत पाठवले.
सूर्याची शतकी खेळी -
सूर्यकुमार यादव याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. ४९ चेंडूत सूर्यकुमार यादव याने १०३ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादवने ११ चौकार आणि सहा षटकार लगावले. आरसीबीविरोधात जिथे खेळ थांबवला तिथूनच सूर्यकुमार याने फलंदाजी सुरु केली होती. रोहित शर्मा याने वादळी फलंदाजी करत शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादव याने ४९ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शतक करण्यासाठी सूर्यकुमार यादवला तीन धावांची गरज होती.. सूर्यकुमार यादव याने अल्जारी जोसेफ याला षटकार लगावत शतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादव याने सुरुवातीपासूनच गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार यादव याच्या वादळी फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने २०० धावांचा पल्ला पार केला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव याने आक्रमक फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव याने पहिल्या ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले.. त्यानंतर पुढील १७ चेंडूत ५३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. त्याशिवाय मागील १२ वर्षात मुंबईसाठी शतक झळकावणारा सुर्यकुमार यादव पहिलाच फलंदाज आहे. रोहित शर्मानंतर मुंबईच्या फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते.