एक्स्प्लोर

हैदराबाद-लखनौ सामन्यात पाऊस राडा घालणार, चेन्नईला बसणार फटका!

IPL 2024, SRH VS LSG : आयपीएल 2024 आता ऐन रंगात आली आहे. साखळी फेरीतील फक्त 15 सामने शिल्लक आहेत. बुधवारी सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.

IPL 2024, SRH VS LSG : आयपीएल 2024 आता ऐन रंगात आली आहे. साखळी फेरीतील फक्त 15 सामने शिल्लक आहेत. बुधवारी सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. हैदराबाद आणि लखनौ संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे.  पण आता दोन्ही संघांसाठी अतिशय वाईट बातमी आली आहे. हैदराबादमध्ये जोरदार पाऊस झालाय, याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

SRH vs LSG हा सामना हैदराबादमधील उप्पल स्टेडियमवर पार पडणार आहे. पण मंगळवारी हैदराबादमध्ये जोरदार पाऊस झालाय. मैदानावर पाणीच पाणी झाल्याचं समोर आलेय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उप्पल स्टेडियमची खेळपट्टी कव्हर्सने झाकण्यात आली आहे. पण जोरदार पावसामुळे मैदानात पाणीच पाणी झाले आहे. हैदराबादमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुधवारीही हैदराबादमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही, तर हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना रद्द होऊ शकतो. मैदानावर पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. 

 दोन्ही संघाला एक एक गुण

पावसामुळे हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. जर हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर आयपीएलमधील प्लेऑफची लढत अधिक रंगतदार होणार आहे. हैदराबाद आणि लखनौ संघाने यंदाच्या हंगामात प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाच्या नावावर प्रत्येकी 12 - 12 गुण आहेत. पण हैदराबादचा रनरेट सरस असल्यामुळे ते टॉप 4 मध्ये आहेत. लखनौचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघाचे प्रत्येकी 13-13 गुण होतील. जर असं झालं तर चेन्नईच्या संघाला फटका बसणार आहे. कारण, हैदराबाद आणि लखनौ संघ टॉप 4 मध्ये एन्ट्री करतील. तर चेन्नईचा संघ पाचव्या क्रमांकावर घसरणार आहे. 

चेन्नईचं टेन्शन वाढलं - 

आयपीएल 2024 सध्या रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय. प्रत्येक सामन्यागणिक गणित बदलत आहेत. बुधवारी हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना रद्द झाला तर चेन्नईला फटका बसणार आहे. कारण, चेन्नईची गुणतालिकेत घसरण होणार आहे. त्याशिवाय पुढील आव्हानही खडतर होणार आहे. कारण, राजस्थान आणि कोलकाता संघ आधीच अव्वल स्थानावर आहेत. जर लखनौ आणि हैदराबादचा एक एक सामना रद्द झाला. त्यानंतर त्यांनी दोन सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 17 गुण होतील. आशा स्थितीमध्ये चेन्नई प्लेऑफमध्ये पात्र होऊ शकत नाही. कारण चेन्नईने उर्वरित सर्व सामने जिंकले तर त्यांचे 16 गुण होऊ शकतात. त्यामुळे सामना हौदराबाद आणि लखनौ यांच्यातील पण नजर चेन्नईच्या संघाची असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखीBeed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीतCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Embed widget