(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: सुनील नारायणचा नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू
Sunil Narine, IPL 2022 Marathi News : राहुलच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघाने कोलकात्याचा 75 धावांनी दारुण पराभव केला. एकतर्फी सामन्यात कोलकात्याच्या सुनील नारायण याने लक्षवेधी कामगिरी केली.
Sunil Narine, IPL 2022 Marathi News : राहुलच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघाने कोलकात्याचा 75 धावांनी दारुण पराभव केला. एकतर्फी सामन्यात कोलकात्याच्या सुनील नारायण याने लक्षवेधी कामगिरी केली. अष्टपैलू सुनील नारायणने शनिवारी नव्या विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये एक हजार धावा आणि 150 पेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम नारायणने केलाय. अशी कामगिरी करणारा नारायण दुसराच खेळाडू आहे. याआधी डेवेन ब्राव्होने हा कारनामा केलाय.
आयपीएलमध्ये एक हजारपेक्षा जास्त धावा आणि 150 पेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम करणारे दोन्ही खेळाडू वेस्ट विंडिज संघाचेच आहेत. ब्राव्होने सर्वात आधी हा कारनामा केलाय. आता सुनील नारायणही त्या रांगेत बसलाय. लखनौविरोधात शनिवारी झालेल्या सामन्यात नारायणने गोलंदाजी करताना 20 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. त्यानंतर फलंदाजी करताना 12 चेंडूत 22 धावा चोपल्या. यासह नारायणने आयपीएलमध्ये एक हजार धावांचा टप्पा पार केला. यासह एक हजार पेक्षा जास्त धावा आणि 150 पेक्षा जास्त विकेट घेणारा आयपीएलमधील दुसरा खेळाडू ठरलाय. नारायणने आयपीएलमध्ये आतापर्यंत 145 सामन्यात 151 विकेट घेतल्या आहेत. तर 1003 धावा केल्या आहेत. नारायणच्या आधी हा कारनामा वेस्ट विंडिजच्या डेवेन ब्राव्होने केलाय. ब्राव्होने 159 सामन्यात 181 विकेट घेतल्या आहेत. तर 1547 धावा केल्या आहेत.
कोलकात्याचा 75 धावांनी पराभव -
डिकॉकच्या वादळी अर्धशताकानंतर आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर लखनौने कोलकात्याचा 75 धावांनी पराभव केलाय. 177 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना लखनौच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. लखनौच्या गोलंदाजापुढे कोलकात्याची फलंदाजी कोलमडली. कोलकात्याचा संघ 20 षटके फलंदाजीही करु शकला नाही. कोलकात्याचे संघाने 14.3 षटकांत सर्वबाद 101 धावा केल्या. लखनौने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. बाबा इंद्रजीत एकही धाव न काढता माघारी परतला. त्यानंतर अॅरॉन फिंच (14), कर्णधार श्रेयस अय्यर (6), नितीश राणा (2), रिंकू सिंह (6), अनुकुल रॉय (0), टीम साऊदी (0) आणि ह्रतेश राणा (2) धावा काढून बाद झाले. रसल आणि नारायणचा अपवाद वगळता कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रसेलने 19 चेंडूत 45 धावांची तर नारायणने 12 चेंडूत 22 धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. 8 फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. तीन फलंदाजला भोपळाही फोडता आला नाही.
हे देखील वाचा-