एक्स्प्लोर

WTC Final आधी पंतप्रधान मोदींनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची भेट

PM Modi with Australian Players : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपची फायनल होणार आहे.

PM Modi with Australian Players : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपची फायनल होणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. थांब... झालं काय... पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कमिन्स आणि मोदी यांची भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, याआधीही ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला तोव्हा पॅट कमिन्सने मोदींची भेट घेतली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर गेले होते, त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश होता. सिडनीमध्ये नरेंद्र मोदी यांनी काही बिजनेस लीडर्ससोबत बैठक होती. त्याशिवाय ऑस्ट्रेलियातील काही दिग्गज खेळाडूंसोबतही भेट झाली. यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स आणि माजी कर्णधार स्टीव वॉ याचा समावेश आहे. या भेटीचे फोटो समोर आलेत. 

पॅट कमिन्स भारताविरोधात खेळण्यास सज्ज आहे. सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. ओव्हल मैदानावर ही लढत होणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि मोदी यांची भेट झाली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिडनी इथे व्यावसायिकांच्या गोलमेज परिषदेत संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी इथे ऑस्ट्रेलियातील प्रमुख कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांच्या गोलमेज परिषदेला  संबोधित केले. या बैठकीला, पोलाद, बँकिंग, ऊर्जा, खनिज  आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या विद्यापीठांचे कुलगुरु देखील या बैठकीला उपस्थित होते. देशात, आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठी आणि उद्योग स्नेही वातावरण निर्मितीसाठी करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा आणि उपक्रम यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. यात, पायाभूत दळणवळण सुविधा एकमेकांशी जोडण्यासाठीचे मिशन गती शक्ती अभियान, जन धन आधार मोबाईल त्रिसूत्री , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हायड्रोजन मिशन 2050, पीएलआय योजना, अवकाश आणि भू-अवकाश क्षेत्रे खाजगी गुंतवणूकीसाठी खुली करणे, वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी नवे धोरण, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना इत्यादीची माहिती दिली. पायाभूत सुविधा, ज्यात, डिजिटल पायाभूत सुविधासह पायाभूत क्षेत्र , माहिती तंत्रज्ञान, फीन-टेक, टेलिकॉम, सेमीकंडक्टर, अवकाश, अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, शिक्षण, औषधनिर्माण, आरोग्यसेवा, वस्त्रोद्योग, कृषी आणि अन्नप्रक्रिया   क्षेत्रांमध्ये भारताने गुंतवणुकीच्या संधी खुल्या केल्या असून, सर्व कंपन्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आमंत्रण पंतप्रधानांनी दिले. या सर्व क्षेत्रातील कंपन्यांनी भारतातील त्यांच्या समकक्ष कंपन्यांशी परस्पर लाभदायक अशी भागीदारी करावी, यासाठी पंतप्रधानांनी त्यांना प्रोत्साहन दिले. 

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget