शेवट गोड करण्यासाठी हैदराबाद-पंजाब भिडणार, कशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग XI
SRH vs PBKS, IPL 2022 : आज आयपीएलच्या अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने
SRH vs PBKS, IPL 2022: आज आयपीएलच्या अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघाचे प्लेऑफमधील आव्हान आधीच संपुष्टात आलेय. अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन्ही संघ आमनेसामने येतील.
दोन्ही संघाची फलंदाजी हीच कमकुवत बाजू आहे. हैदराबादकडून राहुल त्रिपाठी तर पंजाबकडून जॉनी बेअरस्टो यांनी धावा काढल्या आहेत. पण त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही. दोन्ही संघाच्या फलंदाजीची मदार पुन्हा एकदा या दोन्ही फलंदाजावर असणार आहे. गोलंदाजीत दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
हैदराबाद संघाची धुरा केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार सांभाळण्याची शक्यता आहे. सनराइसर्ज हैदराबादने लागोपाठ पाच पराभवाची मालिका मुंबईविरोधात निसटता विजय मिळवत मोडली होती. पंजाबला आपल्या अखेरच्या सामन्यात दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मयांकच्या नेतृत्वात पंजाबची कामगिरी खराब राहिली आहे. यंदाच्या हंगामात पंजाबला लागोपाठ दोन सामने जिंकता आलेले नाहीत.
SRH आणि PBKS संघाची संभावित प्लेइंग XI
Sunrisers Hyderabad
निकोलस पूरन, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, प्रियम गर्ग, एडेन मार्करम, वॉशिंगटन सुंदर, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), टी.नटराजन, उमरान मलिक
Punjab Kings
मयंक अग्रवाल (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, शिखर धवन, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कगिसो रबाडा, संदीप शर्मा, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह
सामन्याचे डिटेल
सामना - SRH vs PBKS, IPL 2022, 70वा सामना
तारीख - 22 मे 2022, 7.30 IST
ठिकाण - वानखेडे स्टेडियम, मुंबई
कसा आहे पिच रिपोर्ट?
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची टक्केवारी येथे जास्त आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. खेळपट्टी गोलंदाजाला मदत करेल असा अंदाज आहे. पण दुसऱ्या डावात फलंदजीसाठी पोषक असेल.
हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील एकूण सामन्याची आकडेवारी पाहिल्यास हैदराबादचा संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. यामध्ये १३ सामन्यात हैदराबादने तर सहा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. दोन्ही संघासाठी हा सामना फक्त औपचारिक आहे. पण या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा प्रयत्न पंजाब आणि हैदराबाद करतील, यात शंका नाही.