Sanju Samson : अनलकी सॅमसन! संजूची धोनीच्या नकोशा विक्रमाशी बरोबरीो
IPL 2022: मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील सामन्यात नाणेफेक संजूने गमावल्याने धोनीने फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.
Sanju Samson : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 68 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (RR vs CSK) संघ आमने-सामने आहेत. सामन्यापूर्वी राजस्थानचा कर्णधार संजूने नाणेफेक गमावल्याने चेन्नईने फलंदाजी निवडली. दरम्यान नाणेफेक गमावल्यामुळे संजू सॅमसनने धोनीच्या एका नकोशा विक्रमाशी बरोबरी केली आहे. संजूने ही नाणेफेक गमावल्यामुळे त्याने यंदाच्या हंगामात तब्बल 12 वेळा नाणेफेक गमावली आहे. 14 सामन्यात 12 वेळा नाणेफेक गमावल्याने संजूने केवळ दोनच वेळा नाणेफेक जिंकली आहे. 2012 मध्ये देखील धोनीने चेन्नईचं कर्णधारपद भूषवताना इतक्याच वेळा नाणेफेक गमावली होती. पण संजूचा संघ प्लेऑफमध्ये गेल्यास आणखी सामने खेळेल. त्यामुळे नाणेफेक गमावण्यात तो धोनीलाही मागे टाकू शकतो.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात संजू सॅमसननं नेतृत्वात राजस्थानच्या संघानं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. राजस्थाननं 13 सामन्यांपैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत 16 गुणांसह राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, नाणेफेकीच्या बाबतीत संजू सॅमसन इतका कमनशिबी कर्णधार कोणताच असू शकत नाही असं वाटतं. संजू सॅमसन आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 12 वेळा नाणेफेक गमावली आहे. पण प्लेऑफमध्ये संघ गेल्यास यंदा संजू चषक जिंकवून देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आजचा विजय आणि राजस्थान प्लेऑफमध्ये
आज पार पडणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (RR vs CSK) या सामन्यात राजस्थानचा संघ जिंकल्यास ते थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवतील आणि गुणतालिकेतही झेप घेऊ शकतात. पण सामना गमावला तरी त्यांचा नेटरनरेट चांगला असल्याने ते नक्कीच पुढील फेरीत पोहोचतील. तर चेन्नई सुपरकिंग्सचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना असल्याने ते स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आज सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.
हे देखील वाचा-