एक्स्प्लोर

IPL Playoff 2022 : आरसीबीचे प्लेऑफचे तिकिट मुंबईच्या हातात, हैदराबाद-पंजाबचा गाशा गुंडाळला 

IPL Playoff 2022 : आरसीबीने प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. पण आरसीबीचं प्लेऑफचं तिकीट मुंबई इंडियन्सच्या हातात आहे.

IPL Playoff 2022 : 'करो या मरो'च्या लढतीत विराट कोहलीच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने गुजरातचा आठ विकेटने पराभव केला. या विजयासह आरसीबीने प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. पण आरसीबीचं प्लेऑफचं तिकीट मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. शनिवारी दिल्ली आणि मुंबई यांच्यात होणाऱ्या सामन्यावर आरसीबीचं प्लेऑफचं तिकीट फायनल होणार आहे. 

मुंबईच्या हातात आरसीबीचं नशीब - 
21 मे रोजी शनिवारी मुंबई आणि दिल्ली आपला अखेरचा साखळी सामना खेळणार आहेत. या सामन्याकडे आरसीबीच्या चाहत्यांचेही लक्ष असणार आहे. कारण, या सामन्यावर आरसीबीचं प्लेऑफचा प्रवेश ठरणार आहे. अखेरच्या लीग सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केल्यास आरसीबीचा सरळ प्लेऑफमध्ये प्रवेश होईल... पण जर दिल्लीने मुंबईवर विजय मिळवल्यास आरसीबीचे आव्हान संपुष्टात येईल.. मुंबईचा पराभव झाल्यास आरसीबी आणि दिल्ली यांचे 16 गुण होतील. पण दिल्लीचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे नेटरनरेटच्या आधारावर दिल्लीला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. आरसीबीचा नेटरनरेट -253 इतका आहे तर दिल्लीचा नेटरनरेट + 225 इतका आहे. 

पंजाब-हैदराबादचं आव्हान संपलं - 
आरसीबीने गुजरातवर विजय मिळवल्यामुळे पंजाब आणि हैदराबाद यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. कारण या दोन्ही संघाचे 13 सामन्यात प्रत्येकी 12 गुण आहेत. या गुजरात आणि दिल्ली या दोन्ही संघाचा पराभव झाल्यास या दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये पोहच्याच्या आशा होत्या. पण आरसीबीने विजय मिळवल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आलेय. 

पाच संघाचं आव्हान संपलं - 
आयपीएलमधील सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. तसेच पंजाबचाही गाशा गुंडाळलाय. पंजाबचा अपवाद वगळता प्रत्येक संघाने आयपीएल चषक उंचावलाय. मुंबईने पाच तर चेन्नईने चार वेळा आयपीएल चषक उंचावलाय. कोलकाताने दोन वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलेय. हैदराबाद संघ 2016 मध्ये विजेता झाला होता.. यंदा आयपीएलला नवीन विजेता मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

दोन संघाचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित - 
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ या दोन संघाचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झालाय. गुजरात संघ 14 सामन्यात 20 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर लखनौचा संघ 18 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सला अखेरचा सामना जिंकून दुसऱ्या क्रमांकावर पोहचण्याची संधी आहे. राजस्थानचा अखेरचा सामना चेन्नईबरोबर रंगणार आहे. हा सामना जिंकून राजस्थानचा संघ अव्वल दोनमध्ये स्थान पटकावण्याच्या इराद्याने मैदानावर उतरले. राजस्थान संघाचा नेटरनरेट चांगला आहे. त्यामुळे त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जातोय. राजस्थानचा संघ 16 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचं प्लेऑफमधील स्थान मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्यावर आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोरSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेगABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget