Sakshi Dhoni : वीज टंचाईवर भडकली धोनीची पत्नी साक्षी; ट्वीट करत सरकारला विचारला जाब
Sakshi Dhoni on Power Cut : क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असल्याचं कायम दिसून येतं पण आता तिने एका सामाजिक मुद्यावर भाष्य करत थेट सरकारला जाब विचारला आहे.
![Sakshi Dhoni : वीज टंचाईवर भडकली धोनीची पत्नी साक्षी; ट्वीट करत सरकारला विचारला जाब sakshi dhoni on power cut in ranchi sakshi dhoni not happy about electricity supply in ranchi tweeted in twitter Sakshi Dhoni : वीज टंचाईवर भडकली धोनीची पत्नी साक्षी; ट्वीट करत सरकारला विचारला जाब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/c8e2056c30e6599aa132218110656d66_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sakshi Dhoni Tweet : सध्या देशभरात उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण झाले असून अशातच देशातील बऱ्याच भागात वीजटंचाईचं संकटही उभं राहिलं आहे. अनेक राज्यात तर कित्येक वर्षांपासून वीजकपात, लोडशेडिंग सुरुच असून झारखंडमध्ये देखील वीजटंचाईचं संकट आहे. दरम्यान या संकटावर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने भाष्य करत थेट सरकारला सवाल विचारला आहे. साक्षीने तिच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन सरकारला जाब विचारला आहे.
साक्षी आणि धोनी हे दोघेही त्यांच्या रांची येथील आलिशान फार्म हाऊसमध्ये राहतात. सध्या धोनी आयपीएलसाठी मुंबईला असला तरी साक्षी त्याच ठिकाणी आहे. दरम्यान साक्षीने यावेळी ट्वीट करत वीजटंचाईच्या संकटाबाबत विचारणा केली आहे. तिने लिहिलं आहे की, 'मी एक करदाती असून योग्य पद्धतीने स्वत:ची जबाबदारी पार पाडते मग अशा अडचणी का आहेत. झारखंड राज्याची एक करदाता असण्याच्या नात्याने राज्यात हे वीजसंकट का आहे? आम्ही वीज वाचवण्याबाबत गंभीर असतानाही अशी परिस्थिती का आहे हे मी जाणू इच्छिते.'
याआधीही साक्षीने केला होता सवाल
याआधी जवळपास तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 19 सप्टेंबर, 2019 रोजी साक्षीने ट्वीट करत याबाबतच सवाल विचारला होता. तिने लिहिलं होतं, 'रांचीमधील नागरिक रोज वीज कपातीचा सामना करत आहे. दररोज 4 ते 7 तास वीज नसते. आज 19 सप्टेंबर, 2019 दिवशी देखील पाच तास वीज नव्हती. आज हवामान चांगलं असून कोणता सणही नाही, त्यामुळे मला अपेक्षा आहे संबधित विभाग याबाबत योग्यती कारवाई करेल.'
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)