एक्स्प्लोर

RR vs DC, Top 10 Key Points : दिल्लीचा राजस्थानवर 8 गडी राखून विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या आजच्या सामन्यात दिल्लीने राजस्थानवर दमदार विजय मिळवला असून सामन्यातील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया...

RR vs DC, IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आज पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा (DC vs RR) 8 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 161 धावांचे आव्हान दिल्लीला दिले.  हे आव्हान दिल्लीचे फलंदाज मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी दमदार अर्धशतकं झळकावत पार केलं आहे. दिल्लीने 18.1 षटकात दोन गडी गमावत हे आव्हान पार केलं असून सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

RR vs DC 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. आजही दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आणि सामनाही खिशात घातला.
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज राजस्थानकडून आर आश्विनने कारकिर्दीतील पहिलं वहिलं अर्धशतक झळकावलं. पण दिल्लीच्या मार्श वॉर्नर जोडीच्या तुफान खेळीमुळे राजस्थानला 8 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. 
  3. पहिली फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाला यंदाच्या हंगामात तीन शतकं लगावणाऱ्या जोस बटलरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण बटलर 7 धावा करुन स्वस्तात माघारी परतला. 
  4. पण त्यानंतर वन डाऊन थेट आश्विन मैदानात अवचरला आणि त्याने संघाटा डाव एकहाती सावरला.  
  5. दुसऱ्या बाजूने यशस्वी, संजू हे महत्त्वाचे फलंदाज बाद होत होते. पण आश्विनने टिकून राहत 38 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने 30 चेंडूत 48 धावांची तुफान खेळी करत संघाचा डाव 160 पर्यंत नेला.
  6. 20 षटकानंतर सहा गडी गमावत राजस्थानने 160 धावा केल्या ज्यामुळे दिल्लीसमोर विजयासाठी 161 धावांचे आव्हान होते. 
  7. राजस्थान संघाने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाने शून्य धावांवर पहिली विकेट गमावली. बोल्टने घेतलेल्या भरतच्या विकेटने राजस्थानच्या आशा पल्लवीत झाल्या.
  8. पण त्यानंतर मात्र मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने टिकून राहून दमदार फलंदाजी केली. दोघांनी तुफान फटकेबाजी करत संघाचा विजय पक्का केला.
  9. मार्श 89 धावा करुन 18 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण नंतर पंतने लागोपाठ दोन सिक्स खेचले तर वॉर्नरने स्वत:चं अर्धशतक पूर्ण करत संघाला 8 विकेट्सनी विजय मिळवून दिला. 
  10. दिल्लीच्या या विजयात आधी गोलंदाजाच्या भेदक गोलंदाजीला मार्श वॉर्नर जोडीच्या फलंदाजीची मदत मिळाली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Parbhani : महादेव जानकर माझे लहान भाऊ, परभणीच्या सभेत मोदींकडून कौतुकNashik Loksabha Election 2024 : नाशिकची जागा सेनेला तर राष्ट्रवादीला कुठली जागा मिळणार ?Jaysingh Mohite Patil on Uttamrao Jankar : तुम्हीही शब्द द्या...मोहितेंना काय म्हणाला कार्यकर्ता?Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 20 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Telly Masala : IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
Bollywood Actress : ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्यानं दारूच्या नशेनं रस्त्यावर आणलं; दिग्गज अभिनेत्रीची शोकांतिका
ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्यानं दारूच्या नशेनं रस्त्यावर आणलं; दिग्गज अभिनेत्रीची शोकांतिका
Embed widget