MS Dhoni: धोनीच्या आयपीएल कारकिर्दीला आज फूल स्टॉप लागणार? सुनील गावस्कर म्हणतात...
MS Dhoni: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे.
![MS Dhoni: धोनीच्या आयपीएल कारकिर्दीला आज फूल स्टॉप लागणार? सुनील गावस्कर म्हणतात... RR vs CSK IPL 2022: MS Dhoni playing his last IPL game for CSK tonight? Definitely Not, reckons Sunil Gavaskar MS Dhoni: धोनीच्या आयपीएल कारकिर्दीला आज फूल स्टॉप लागणार? सुनील गावस्कर म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/15/df5adef7c108045db21a2f5eb6d9f6ef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MS Dhoni: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. दरम्यान, मुंबईविरुद्ध पराभवानंतर चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आज चेन्नईचा संघ या हंगामातील त्यांचा अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार की नाही? याबाबत क्रिडाविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. यातच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीच्या आयपीएल 2023 खेळण्यावरून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. धोनी अजूनही क्रिकेटबद्दल उत्सुक आहे. पुढच्या हंगामातही तो खेळेल असं दिसतंय. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यानं नाबाद 36 धावांची खेळी केली होती.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
दरम्यान, गावस्कर म्हणाले की, "मला असं वाटतं की तुम्ही धोनीला पिवळ्या जर्सीत नक्कीच पहाल. मग ही जर्सी खेळाडूंची असेल किंवा दुसरी कोणती, तो आपल्याला चेन्नईच्याच संघात दिसणार. तो कदाचित मेंटॉर म्हणून चेन्नईच्या संघात कायम राहीन. त्याला पुढं खेळायचं नसतं तर त्यानं पुन्हा कधीच कर्णधारपद स्वीकारलं नसतं. जाडेजाला दुखापत होण्याच्या दोन सामन्यापूर्वी त्याला संधी जाऊ शकत होती. धोनी जडेजाला दोन-चार सामन्यांचा अनुभव देऊ शकला असता. धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल,यात काही प्रश्नच नाही."
आयपीएल 2022 मध्ये चेन्नईची निराशाजक कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात धोनीनं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. परंतु, जेव्हा संधी मिळाली, तेव्हा धोनीनं धावा केल्या. यंदाच्या हंगामात 13 सामन्यापैकी 12 डावात 206 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात धोनीनं चार सामन्यात चेन्नईच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी दोन सामन्यात विजय तर, दोन सामने गमावले आहेत. यापूर्वी आठ सामन्यात रवींद्र जाडेजानं चेन्नईच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर पुन्हा धोनीकडं कर्णधारपद सोपवलं.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी
धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 233 सामने खेळले आहेत. ज्यात 39. 30 च्या सरासरीनं आणि 135. 52 च्या स्ट्राईक रेटनं 4 हजार 952 धावा केल्या आहेत. ज्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीनं आपल्या आयपीएलच्या संपूर्ण कारकिर्दीत एकून 228 षटकार आणि 345 चौकार मारले आहे. तर, 135 झेल आणि 39 स्टंपिंग केल्या आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)