RR vs CSK, Head to Head : राजस्थान आणि चेन्नईमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL 2022 : आज पार पडणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यापूर्वी दोघांच्या एकमेंकाविरुद्धच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर फिरवूया...
RR vs CSK : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) आज पार पडणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (RR vs CSK)या सामन्यात जागतिक क्रिकेटमधील काही दमदार खेळाडू आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात असणार असून आजचा विजय राजस्थानसाठी थेट प्लेऑफचं तिकिट असेल. तर चेन्नई हंगामातील अखेरचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने 13 पैकी केवळ 9 सामने गमावल्याने त्यांच्या नावावर 8 गुण असून ते नवव्या स्थानावर आहेत. तर राजस्थानने मात्र 13 पैकी 8 सामने जिंकल्याने त्यांच्या नावावर 16 गुण आहेत. त्यामुळे यंदा चेन्नईपेक्षा राजस्थान चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण आजवरच्या इतिहासाचा विचार करता चेन्नई राजस्थानवर भारी पडल्याने आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो. तर आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर फिरवूया...
राजस्थान विरुद्ध चेन्नई Head to Head
आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (RR vs CSK) हे संघ तब्बल 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचंच पारडं जड राहिलं आहे. चेन्नईने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
राजस्थान - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल
चेन्नई - डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मिचेल सँटनर, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, प्रशांत सोळंकी.
हे देखील वाचा-