RR vs CSK: इमरान ताहिरचा विक्रम मोडण्यासाठी युजवेंद्र चहल उतरणार मैदानात
RR vs CSK, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) चमकदार कामगिरी करून दाखवली आहे.
RR vs CSK, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच युजवेंद्र चहलकडं पर्पल कॅप होती. परंतु, लीग स्टेजच्या अंतिम टप्प्यात आरसीबीच्या वानिंदु हसरंगानं पर्पल कॅपवर कब्जा केला. यंदाच्या हंगामात दोन्ही खेळाडूंनी 15 सामन्यांमध्ये 24-24 विकेट घेतल्या आहेत. परंतु, हसरंगाचा इकॉनीमी रेट चहलपेक्षा चांगला आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलच्या नजरा हसरंगाला मागे टाकण्यासोबतच एका मोठ्या विक्रमावर असतील. आजच्या सामन्यात चहलकडं इमरान ताहिरचा (Imran Tahir) विक्रम मोडण्याची संधी आहे. या विक्रमापासून तो तीन विकेट्स दूर आहे.
इमरान ताहिरचा विक्रम मोडण्यापासून चहल तीन विकेट्स दूर
आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना इमरान ताहिरनं एका हंगामात 26 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. यंदाच्या हंगामात युजवेंद्र चहलनं आतापर्यंत 24 विकेट्स घेतल्या आहे. इमरान ताहिरचा विक्रम मोडण्यासाठी त्याला चेन्नईविरुद्ध आजच्या सामन्यात तीन फलंदाजांना माघारी धाडावं लागेल.
आजचा सामना राजस्थानसाठी महत्वाचा
चेन्नईविरुद्ध सामना राजस्थानच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल. परंतु, पराभूत झाल्यास त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहवं लागेल.
यंदाच्या हंगामात चेन्नईची खराब कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून चेन्नईचा संघ बाहेर पडला आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघानं 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 9 सामने गमावले आहेत. तर, केवळ चार सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-
- RR vs CSK, Head to Head : राजस्थान आणि चेन्नईमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
- IPL 2022, RR vs CSK : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान मैदानात, तर चेन्नई शेवट तरी गोड करणार का? कधी, कुठे पाहाल सामना?
- GT vs RCB, IPL 2022: गुजरातच्या पराभवामुळं हार्दिक पांड्या भडकला, सांगितलं सामना गमावल्यामागचं मोठं कारण