कमबॅक सामन्यात फेल, ऋषभ पंतला राग अनावर, व्हिडीओ व्हायरल
Rishabh Pant Comeback IPL 2024 : तब्बल 454 दिवसानंतर ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर परतला. आज दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामन्यातून ऋषभनं मैदानावर कमबॅक केले.
Rishabh Pant Comeback IPL 2024 : तब्बल 454 दिवसानंतर ऋषभ पंत क्रिकेटच्या (Rishabh Pant Comeback) मैदानावर परतला. आज दिल्ली आणि पंजाब यांच्यातील (PBKS vs DC) सामन्यातून ऋषभनं मैदानावर कमबॅक केले. 30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंत याच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये पंतला गंभीर दुखापत झाली. मागील काही दिवसांपासून तो फिटनेसवर काम करत होता. अखेर आज तो मैदानावर परतला. पण त्याचं कमबॅक तितकं यशस्वी झालं नाही. चांगल्या सुरुवातीनंतरही पंतला मोठी खेळी करता आली नाही. मोक्याच्या क्षणी बाद झाल्याची जाण पंत झाली. त्यामुळे डगआऊटमध्ये गेल्यानंतर पंतला राग अनावर झाला. कोच रिकी पाँटिंगजवळ त्यानं राग व्यक्त केला. पाँटिंगनं पंतला समजावलं. पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ -
😭😭😭😭😭 pic.twitter.com/SJHWv0PZuE
— j (@botcies) March 23, 2024
पंतची छोटोखानी खेळी -
पंजाबचा कर्णधार शिखर धवन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरुवात करुन दिली. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर शाय होफ आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला. पंतने जवळपास दीड वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले. पंत आणि शाय होप यांनी वेगानं धावा जमवण्यास सुरुवात केली. खासकरुन होफ यानं पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शाय होप यानं 25 चेंडूत 33 धावांचं योगदान दिलं. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुखापतीनंतर पुन्हा मैदानावर कमबॅक करणाऱ्या पंतला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. पंतला फक्त 18 धावाच करता आल्या. पंतने या खेळीमध्ये दोन चौकार ठोकले.
A Walk To Remember 🥹pic.twitter.com/uLhj9jO28q
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 23, 2024
ऋषभ पंतचे कमबॅक -
454 दिवसानंतर ऋषभ पंत यानं मैदानावर पाऊल ठेवलं. स्टेडियममधील उपस्थिती चाहत्यांनी त्याला उभं राऊन दाद दिली. एखाद्या चित्रपाटाप्रमाणेच पंतच्या कमबॅकची चाहते वाट पाहत होते. आज तो दिवस आलाच. पंत लवकर बाद झाल्याचं दुख नाही, पण त्याचं कमबॅक महत्वाचं आहे... अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या आहेत.